मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravindra Jadeja: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी गूड न्यूज; जडेजाची मैदानात एन्ट्री!

Ravindra Jadeja: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी गूड न्यूज; जडेजाची मैदानात एन्ट्री!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 25, 2023 09:58 AM IST

Ravindra Jadeja Injury Updates: भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे गेले सहा महिने क्रिकेटपासून दूर होता. मात्र, रणजी स्पर्धेतून त्याने मैदानात एन्ट्री केली असून तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसण्याची शक्यता आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

Ravindra Jadeja Recovers From Injury: भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो सहा महिने क्रिकेटपासून दूर होता. पण आता तो मैदानात परतला असून रणजी स्पर्धेत सौराष्ट्रकडून खेळत आहे. तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा सौराष्ट्र संघाचे नेतृत्व करत आहे. रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकावे लागले आहे. भारतीय संघावरही त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता तो दुखापतीतून सावरला असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनधित्व करताना दिसत आहे.

रवींद्र जडेजाने नोव्हेंबर 2018 मध्ये अखेरची रणजी स्पर्धा खेळली होती. आशिया चषकादरम्यान ऑगस्ट २०२२ मध्ये रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. परिणामी, त्याला स्पर्धेतूनही बाहेर पडावे लागले होते. तब्बल सहा महिने तो क्रिकेटपासून दूर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात नुकताच त्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र. त्याची निवड फिटनेसवर अवलंबून असेल. त्यामुळेच तो रणजी स्पर्धेत सहभागी झाला आहे.

भारतीय संघाला फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. हे चारही सामने टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. आतापर्यंत फक्त पहिल्या दोन कसोटींसाठीच संघ जाहीर करण्यात आला आहे.

रवींद्र जडेजा पूर्णपणे तंदुरुस्त असणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे यावर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही होणार असून भारतीय संघाला रवींद्र जडेजासारख्या खेळाडूची नितांत गरज आहे. रणजी स्पर्धेत तो कशी कामगिरी बजावतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, एस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीप), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

WhatsApp channel

विभाग