मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul Athiya Shetty : अथिया की राहुल कोण जास्त कमावतं? आकडे पाहून थक्क व्हाल, बघा दोघांची नेटवर्थ
KL Rahul Athiya Shetty net worth
KL Rahul Athiya Shetty net worth

KL Rahul Athiya Shetty : अथिया की राहुल कोण जास्त कमावतं? आकडे पाहून थक्क व्हाल, बघा दोघांची नेटवर्थ

24 January 2023, 22:26 ISTRohit Bibhishan Jetnavare

KL Rahul-Athiya Shetty net worth : भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (२३ जानेवारी) रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला.

KL Rahul-Athiya Shetty wedding : भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (२३ जानेवारी) रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला. यानंतर या कपलबाबत बरीच चर्चा सुरू आहे. यांपैकीच एक म्हणजे दोन्ही पती पत्नींमध्ये कोण जास्त कमाई करते अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे. चला तर बघूया या जोडप्याची एकूण संपत्ती किती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आथिया शेट्टीची संपत्ती किती?

अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. चित्रपटातून तिने फारशी कमाई केलेली नाही. अथियाचा पहिला चित्रपट हिरो हा होता. हिरो चित्रपट फारसा चालला नाही. पण यातून अथियाला बरीच ओळख मिळाली.  गेल्या वर्षी अथिया शेट्टीची एकूण संपत्ती २८ कोटींच्या घरात होती. मात्र दरवर्षी ती वाढत आहेत. ती एका जाहिरातीसाठी ३० ते ५० लाख रुपये घेते. तर ती एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये घेते. याशिवाय तिने काही अल्बमही केले आहेत. तिने आतापर्यंत हिरो, मोतीचूर-चकनाचूर, मुबारका आणि नवाबजादे या ४ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

केएल राहुलचे नेटवर्थ

आता क्रिकेट स्टार केएल राहुलबद्दल बोलूया, तो टीम इंडियाच्या टॉप खेळाडूंमध्ये आहे. सध्या तो त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत असला तरी त्याने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्याची एकूण संपत्ती ७५ कोटी रुपयांच्या घरात आहे. म्हणजे राहुलची एकूण संपत्ती अथियाच्या तिप्पट आहे. IPL २०२२ मध्ये राहुलला १७ कोटी रुपये मिळाले होते. त्याने १५ सामने खेळले. राहुलला प्रत्येक सामन्यासाठी १.१३ कोटी रुपये मिळाले.

दोघांची एकूण संपत्ती एकत्र केली तर त्यांची कमाई जवळपास १०० कोटी रुपये होईल. केएल राहुल अ श्रेणीच्या खेळाडूंमध्ये येतो. या श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआय एका वर्षासाठी ५ कोटी रुपये देते. याशिवाय राहुल अनेक ब्रँडच्या जाहिरातीही करतो.