मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL: शेवट गोड करण्यासाठी आज CSK खेळणार; चाहत्यांच्या नजरा धोनीवर

IPL: शेवट गोड करण्यासाठी आज CSK खेळणार; चाहत्यांच्या नजरा धोनीवर

May 20, 2022, 04:10 PM IST

    • आयपीएल (IPL 2022) स्पर्धेबाहेर फेकली गेलेली चेन्नई सुपर किंग्स (CSK) आज स्पर्धेतील शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यासाठी कोणते नवे चेहरे दिसणार याविषयी उत्सुकता आहे.
चेन्नई सुपर किंग्स (PTI)

आयपीएल (IPL 2022) स्पर्धेबाहेर फेकली गेलेली चेन्नई सुपर किंग्स (CSK) आज स्पर्धेतील शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यासाठी कोणते नवे चेहरे दिसणार याविषयी उत्सुकता आहे.

    • आयपीएल (IPL 2022) स्पर्धेबाहेर फेकली गेलेली चेन्नई सुपर किंग्स (CSK) आज स्पर्धेतील शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यासाठी कोणते नवे चेहरे दिसणार याविषयी उत्सुकता आहे.

यंदाची आयपीएल स्पर्धा (IPL 2022) आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून अनेक संघांचे निरोपाचे सामने सुरू झाले आहेत. स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) या स्पर्धेतील अखेरचा सामना आज राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. हा सामना जिंकून धोनी ब्रिगेड शेवट गोड करणार का, याकडं क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

आतापर्यंतच्या अनेक आयपीएल स्पर्धा गाजवणारा चेन्नई सुपर किंग्स हा संघ यंदा फारसा प्रभाव पाडू शकला नाही. प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचा फटका या संघाला बसला. आतापर्यंत खेळलेल्या १३ पैकी ९ सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला. तर, चार सामन्यात विजय मिळाला. त्यामुळं गुणतालिकेतील स्थान घसरून हा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. शेवटचा सामना जिंकून स्पर्धेचा निरोप घेण्याचा या संघाचा प्रयत्न असेल. स्पर्धेबाहेर गेल्यामुळं शेवटच्या सामन्यात चेन्नईकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडं, राजस्थान रॉयल्सनं १३ पैकी आठ सामने जिंकून प्ले ऑफमधील स्थान आधीच पक्कं केलं आहे. राजस्थानचा संघ १६ गुणांसह सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. आजचा सामना जिंकून 'टॉप टू'मध्ये येण्याची संधी राजस्थानला आहे. 

कुठे आणि कधी?

राजस्थान विरुद्ध चेन्नईचा हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. तत्पूर्वी, सात वाजता नाणेफेक होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल. स्टार गोल्ड चॅनेलवरही सामना थेट पाहता येईल. हिंदी आणि इंग्रजी शिवाय मराठी, गुजराती, तेलुगू, तामिळ व मल्याळम भाषेतही समालोचन ऐकता येणार आहे.

आयपीएल गुणतालिकेत गुजरात टायटन्स हा संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातनं १४ पैकी १० सामने जिंकून २० गुण मिळवले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायन्ट्स हा संघ आहे. लखनऊनं १४ पैकी ९ सामने जिंकून १८ गुण मिळवले आहेत. राजस्थाननं आजचा सामना जिंकल्यास गुणतालिकेत हा संघ दुसऱ्या स्थानी झेप घेऊ शकणार आहे.

विभाग