मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Final : आयपीएलच्या फायनलमध्ये कोण जाणार? गुजरात की मुंबई?; गावसकरांनी सांगितलं!

IPL 2023 Final : आयपीएलच्या फायनलमध्ये कोण जाणार? गुजरात की मुंबई?; गावसकरांनी सांगितलं!

May 26, 2023, 02:29 PM IST

  • GT vs MI IPL Qualifier Match : आयपीएलच्या आजच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोण बाजी मारू शकते, याबद्दल सुनील गावसकर यांनी अंदाज वर्तवला आहे.

GT vs MI Semifinal

GT vs MI IPL Qualifier Match : आयपीएलच्या आजच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोण बाजी मारू शकते, याबद्दल सुनील गावसकर यांनी अंदाज वर्तवला आहे.

  • GT vs MI IPL Qualifier Match : आयपीएलच्या आजच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोण बाजी मारू शकते, याबद्दल सुनील गावसकर यांनी अंदाज वर्तवला आहे.

Sunil Gavaskar on GT vs MI IPL Qualifier Match : आयपीएल २०२३ चा दुसरा क्वालिफायर सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या अशा या सामन्याबाबत क्रिकेटचे धुरिण आपापले अंदाज व्यक्त करत आहेत. भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनीही आपलं मत मांडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मुंबईविरुद्धच्या आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सला विजयाची जास्त संधी असल्याचं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे. गावसकर यांनी गुजरात टायटन्सला ५१ टक्के आणि मुंबईला ४९ टक्के दिले आहेत. या टक्केवारीत फारसा फरक नसला तरी घरच्या मैदानाचा गुजरातला फायदा मिळू शकतो, असं गावसकर यांना वाटतं. ते एका क्रीडाविषयक वेबसाइटशी बोलत होते.

IPL Final : निकाल काहीही लागो, आयपीएलला यंदा नवा विजेता मिळणार नाही! कारण…

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्या फलंदाजीबद्दलही गावसकर यांनी मत मांडलं. 'हार्दिकनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जाणं हा पठडीबाहेरचा विचार आहे. याआधीही त्यानं या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. मागच्या दोन-तीन सामन्यांमध्ये त्याची बॅट चालली नाही, तो बचावात्मक पवित्र्यात दिसत होता, असं गावसकर म्हणाले.

'आरसीबीविरुद्ध विजय शंकर तिसऱ्या क्रमांकावर आला. चेन्नई विरुद्ध देखील त्यांनी असंच करायला हवं होतं. पंड्यानं फिनिशर म्हणून सुरुवात केली. त्यामुळं आधी विजय आणि नंतर हार्दिकनं यायला हवं होतं. तसं झालं असतं तर संघाला फायदा झाला असता, असं मतही गावसकर यांनी व्यक्त केलं.

Akash Madhwal IPL Record : लखनऊ संघाला नॉक आउट 'पंच' देणारा आकाश मधवाल आहे कोण?

'गुजरात संघाची गोलंदाजी तगडी आहे. पर्पल कॅपसाठी त्यांच्या संघातील शमी आणि राशिद खान यांच्यात स्पर्धा आहे. शुभमन गिल सध्या उत्तम फॉर्मात असून ऑरेंज कॅपपासून काही धावा दूर आहे. विजय शंकर आणि इतरही चांगले खेळाडू आहेत, ज्याचा फायदा संघाला होऊ शकतो, असं गावसकर म्हणाले.

विभाग