मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cricket Story : रोहित शर्माला हिटमॅन हे नाव कुणी दिलं? ऑस्ट्रेलियाशी आहे खास कनेक्शन

Cricket Story : रोहित शर्माला हिटमॅन हे नाव कुणी दिलं? ऑस्ट्रेलियाशी आहे खास कनेक्शन

Jan 18, 2023, 01:44 PM IST

    • Who gave Rohit Sharma the name Hitman? : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला हिटमॅन हे नाव कुणी दिले हे तुम्हाला माहीत आहे का? रोहितने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकले होते, त्या दिवशीच त्याला हे नाव मिळाले होते.
Rohit Sharma the Hitman

Who gave Rohit Sharma the name Hitman? : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला हिटमॅन हे नाव कुणी दिले हे तुम्हाला माहीत आहे का? रोहितने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकले होते, त्या दिवशीच त्याला हे नाव मिळाले होते.

    • Who gave Rohit Sharma the name Hitman? : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला हिटमॅन हे नाव कुणी दिले हे तुम्हाला माहीत आहे का? रोहितने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकले होते, त्या दिवशीच त्याला हे नाव मिळाले होते.

रोहित शर्माची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. जागतिक क्रिकेटमध्ये तो 'हिटमॅन' म्हणून ओळखला जातो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. रोहितला 'हिटमॅन' हे नाव कोणी दिले? तुम्हाला माहीत आहे का?

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं होतं द्विशतक

सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला २०१३ साली 'हिटमॅन' हे नाव मिळाले. त्यावेळी रोहितने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले होते. त्या सामन्यात २०९ धावा कुटल्या होत्या. रोहितने आपल्या खेळीत १५८ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार आणि १६ षटकारांचा पाऊस पाडला होता. याच सामन्यात रोहितच्या चुकीमुळे विराट कोहली शुन्यावर धावबाद झाला होता.

रोहितला हिटमॅन हे नाव कुणी दिलं?

रोहितला हिटमॅन हे कुणी दिले. याबात त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावून मैदानाबाहेर पडत होता, तेव्हा पीडी नावाच्या टीव्ही क्रूच्या सदस्याने सांगितले की, तू हिटमॅनप्रमाणे फलंदाजी केलीस. आणि हिट (RO-HIT) पण तुझ्या नावात आहे. त्यावेळी कॉमेंटेटर रवी शास्त्री तिथे उभे होते. त्यांनी पीडीचे हे बोलणे ऐकले आणि नंतर कॉमेंट्री दरम्यान मला त्याच नावाने हाक मारायला सुरुवात केली. तेव्हापासून मी हिटमॅन या नावाने प्रसिद्ध झालो".

रोहितने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३ द्विशतके ठोकली आहेत. ३५ वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. मात्र, सध्या त्याच्या फलंदाजीचा वाईट काळ सुरू आहे. अनेक दिवसांपासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.