मराठी बातम्या  /  क्रीडा  /  शनिवारी मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार टीम इंडियाचा माजी कर्णधार, म्हणाला…

शनिवारी मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार टीम इंडियाचा माजी कर्णधार, म्हणाला…

May 20, 2022, 11:57 AM IST

    • टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बँगलोरचा एक प्रमुख फलंदाज शनिवारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पाठिंबा देताना पाहायला मिळणार आहे. मुंबईची गाठ गुजरातशी होणार आहे.
आरसीबीचा फलंदाज विराट कोहली (हिंदुस्तान टाइम्स)

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बँगलोरचा एक प्रमुख फलंदाज शनिवारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पाठिंबा देताना पाहायला मिळणार आहे. मुंबईची गाठ गुजरातशी होणार आहे.

    • टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बँगलोरचा एक प्रमुख फलंदाज शनिवारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पाठिंबा देताना पाहायला मिळणार आहे. मुंबईची गाठ गुजरातशी होणार आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएल सीझन १५ मधून कधीच बाहेर झालीय. आता फक्त उरलेल्या सामन्यात आपली इज्जत राखणं इतकंच काय ते मुंबईच्या खेळाडूंच्या हाती आहे. मुंबईच्या उरलेल्या सामन्यात आता एक सामना असा आहे जो मुंबई जिकल्यास त्याचा फायदा एका दुसऱ्याच संघाला मिळू शकतो आणि तो संघ प्ले ऑफमध्ये आपलं स्थान बळकट करु शकतो. 

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

याच कारणान आता त्या संघाच्या एका प्रमुख खेळाडूनं मुंबईच्या सामन्याला हजेरी लावयचं ठरवलं आहे. नुसती हजेरी हा खेळाडू लावणार नाहीय तर मुंबईच्या खेळाडूंना तो प्रोत्साहित करणार आहे.त्या सामन्याने माझ्या संघाला फायदा होणार असेल तर मी नक्की तो सामना पाहायला जाणार मुंबईच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणार असं हा खेळाडू बिनधास्तपणे सांगतो.

मुंबईचा सामना शनिवारी गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे. गुजरातने आधीच प्ले ऑफमध्ये आपलं स्थान नक्की केलं आहे. मात्र गुजरातवविरुद्ध सामन्यात त्या फलंदाजाची बॅट चांगलीच तळपली होती आणि त्याने आपल्या खेळीनं आरसीबीचं आव्हान जिवंत ठेवलं होतं. तो खेळाडू आहे विराट कोहली. आणि मुंबई जिंकल्यास ज्या संघाला त्याचा थेट फायदा होणार आहे तो संघ आहे आरसीबी.

म्हणूनच मुंबईच्या खेळाडूमना पाठिंबा द्यायला खुद्द विराट कोहली उपस्थित राहाणार आहे. या संदर्भात बोलताना विराटने आणखी माहिती देताना सांगितलं की मी तर मुंबईला सपोर्ट करणार आहे यात शंकाच नाही. मात्र माझ्याखेरीज अन्य २५ समर्थक मुंबईला समर्थन देताना पाहायला मिळू शकतील.

आरसीबीने गुरुवारी साकारलेल्या विजयाने पंजाब आणि हैदराबाद या दोन संघांच्या प्ले ऑफच्या आशांवर पाणी फेरलं आहे. मात्र अजूनही आरसीबी फक्त मुंबईच्या विजयावर अवलंबून आहे. मुंबईचा विजय त्यांना थेट प्ले ऑफमध्ये दाखल करणार आहे. त्यामुळे शनिवारच्या सामन्यात संपूर्ण आरसीबीचा संघ आणि सपोर्ट स्टाफ मुंबईच्या खेळाडूंना पाठिंबा देताना पाहायला मिळाले तर नवल वाटू नये. विराट कोहली मात्र खुलेआम सबके सामने हार्दिक पांड्याच्या गुजरातला डोळे दाखवताना पाहायला मिळणार आहे.