मराठी बातम्या  /  क्रीडा  /  UP vs GG Highlights : रोमहर्षक सामन्यात यूपी विजयी, गुजरातसह आरसीबी स्पर्धेतून बाहेर

UP vs GG Highlights : रोमहर्षक सामन्यात यूपी विजयी, गुजरातसह आरसीबी स्पर्धेतून बाहेर

Mar 20, 2023, 07:13 PM IST

  • GG W vs UPW WPL 2023 Highlights : महिला प्रीमियर लीगच्या १७व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने (UPW) गुजरात जायंट्सचा (GG) पराभव केला. गुजरातने यूपीसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यूपीने २०व्या षटकात एक चेंडू राखून विजय मिळवला.

Grace Harris GG W vs UPW WPL 2023 Highlights

GG W vs UPW WPL 2023 Highlights : महिला प्रीमियर लीगच्या १७व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने (UPW) गुजरात जायंट्सचा (GG) पराभव केला. गुजरातने यूपीसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यूपीने २०व्या षटकात एक चेंडू राखून विजय मिळवला.

  • GG W vs UPW WPL 2023 Highlights : महिला प्रीमियर लीगच्या १७व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने (UPW) गुजरात जायंट्सचा (GG) पराभव केला. गुजरातने यूपीसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यूपीने २०व्या षटकात एक चेंडू राखून विजय मिळवला.

GUJ W vs UP Women IPL Highlights : महिला प्रीमियर लीगच्या १७व्या सामन्यात यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा तीन विकेट्सनी पराभव केला. या विजयासह यूपी संघाने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. या विजयासह यूपीचे सात सामन्यांतून आठ गुण झाले आहेत. त्याचबरोबर गुजरातचे आठ सामन्यांत सहा गुण आहेत. बंगळुरूचे सध्या सात सामन्यांनंतर चार गुण आहेत. या संघाने शेवटचा सामना जिंकला तरी ते जास्तीत जास्त सहा गुण मिळवू शकतील, यूपीशी बरोबरी करू शकणार नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

दरम्यान या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने १९.५ षटकांत लक्ष्य गाठले. युपीकडून ताहिला मॅकग्राने ३८ चेंडूत ५७ धावा आणि ग्रेस हॅरिसने ४१ चेंडूत ७२ धावा केल्या. हॅरिसने ७ चौकार आणि ४ षटकार ठोकले तर मॅकग्राने आपल्या खेळीत ११ चौकार लगावले.

गुजरातचा डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. सोफिया डंकले आणि एल वोल्वार्ड यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. वोल्वार्डने १७ आणि डंकलेने २३ धावा केल्या. हरलीन देओलला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर दयालन हेमलता आणि अॅश्ले गार्डनर यांनी ६१ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली.

हेमलता ३३ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाली. तर गार्डनर ३९ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाली. दोघींनाही पार्श्वी चोप्राने बाद केले.

यानंतर अश्विनी कुमारी ५ आणि सुषमा वर्मा ८ धावा करून नाबाद राहिल्या. युपीकडून पार्श्वी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी अंजली सरवानी आणि सोफी एक्लेस्टोनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.