मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Chris Gayle: ख्रिस गेलची आयपीएलच्या इतिहासातील सहा वादळी शतकं!

Chris Gayle: ख्रिस गेलची आयपीएलच्या इतिहासातील सहा वादळी शतकं!

Mar 25, 2023, 12:20 PM IST

  • Chris Gayle IPL Century: एकेकाळी आयपीएलमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने बॅटीने धुमाकूळ घातला होता.

Chris Gayle

Chris Gayle IPL Century: एकेकाळी आयपीएलमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने बॅटीने धुमाकूळ घातला होता.

  • Chris Gayle IPL Century: एकेकाळी आयपीएलमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने बॅटीने धुमाकूळ घातला होता.

Chris Gayle IPL Records: भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट खेळीच्या जोरावर जगावर छाप सोडली आहे. मात्र, वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या आकडे इतरांपेक्षा वेगळे आहेत. आयपीएलच्या इतिहासात ख्रिस गेलने खेळलेल्या अनेक वादळी खेळींची इतिहासात नोंद आहे. दरम्यान, ख्रिस गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ठोकलेल्या सहा शतक अजूनही चाहते विसरू शकले नाहीत. 

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

१) आयपीएल २०११ मध्ये ख्रिस गेल उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. या हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ५५ चेंडूत १०२ धावांची शतकी खेळी केली होती. ख्रिस गेलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने १७२ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

२) ख्रिस गेलने पंजाब किंग्ज (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध ४९ चेंडूत १०७ धावांची खेळी केली होती. ख्रिस गेलच्या या वादळी खेळीमुळे आरसीबीने पंजाबविरुद्ध २० षटकांत सहा विकेट्स गमावून २०६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

३) आयपीएलच्या २०१३ मध्येही ख्रिस गेलचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. या हंगामात दिल्लीविरुद्ध सामन्यात त्याने अवघ्या ६२ चेंडूत १२८ धावांची खेळी केली होती. ख्रिस गेलच्या वादळी खेळीच्या जोरावर ख्रिस गेलने २० षटकात १ विकेट्स गमावून दिल्लीसमोर २१५ धावांचा डोंगर उभा केला होता.

४) आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएल २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. या सामन्यात त्याने अवघ्या ६६ चेंडूत १७५ धावा केल्या होत्या. ख्रिस गेलचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला ख्रिस गेलचा हा विक्रम मोडता आलेला नाही.

५) आयपीएल २०१५ मध्ये ख्रिस गेलने पंजाबच्या संघाविरुद्ध तुफानी खेळी केली होती. या सामन्यात त्याने ५७ चेंडूत ११७ धावा ठोकल्या होत्या. ज्यामुळे आरसीबीच्या संघाला २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २२६ धावा करता आल्या. हा सामना आरसीबीने १३८ धावांनी जिंकला होता.

६) ख्रिस गेलच्या आयपीएलमधील सर्वोत्तम खेळीच्या यादीत त्याने २०१८ मध्ये हैदराबादविरुद्ध केलेल्या शतकाचा समावेश आहे. युनिव्हर्स बॉसने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ६४ चेंडूत १०४ केल्या होत्या. यादरम्यान, ख्रिस गेलने फक्त एक चौकार आणि ११ षटकार ठोकली होती.

विभाग