मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mohammed Shami: रोहित शर्मासमोर डेथ ओव्हर्सचं टेन्शन, टीम इंडियाला शमीची नितांत गरज

Mohammed Shami: रोहित शर्मासमोर डेथ ओव्हर्सचं टेन्शन, टीम इंडियाला शमीची नितांत गरज

Sep 22, 2022, 06:42 PM IST

    • Mohammed Shami t20 world cup 2022: कर्णधार रोहित शर्मासमोर सर्वात मोठी समस्या डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखणे ही आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाची ही कमकुवत बाजू ठळकपणाने समोर आली आहे. भारतीय गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. पण डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात धावा देत आहेत.
Mohammed Shami

Mohammed Shami t20 world cup 2022: कर्णधार रोहित शर्मासमोर सर्वात मोठी समस्या डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखणे ही आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाची ही कमकुवत बाजू ठळकपणाने समोर आली आहे. भारतीय गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. पण डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात धावा देत आहेत.

    • Mohammed Shami t20 world cup 2022: कर्णधार रोहित शर्मासमोर सर्वात मोठी समस्या डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखणे ही आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाची ही कमकुवत बाजू ठळकपणाने समोर आली आहे. भारतीय गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. पण डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात धावा देत आहेत.

T20 विश्वचषक २०२२ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी १५ खेळाडूंचा संघही जाहीर केला आहे. परंतु रोहित शर्माला अद्यापही आपली मजबूत प्लेइंग इलेव्हन सापडलेली नाही. टीम इंडियाला विश्वचषकापूर्वी अजून ५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळायचे आहेत आणि या पाच सामन्यांमध्येच रोहित शर्माला आपली मजबूत प्लईंग इलेव्हन ठरवण्याची संधी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

कर्णधार रोहित शर्मासमोर सर्वात मोठी समस्या डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखणे ही आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाची ही कमकुवत बाजू ठळकपणाने समोर आली आहे. भारतीय गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. पण डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात धावा देत आहेत. त्यामुळे संघाला अनेकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. जसप्रीत बुमराहच्या आगमनाने गोलंदाजी विभागात नक्कीच थोडीशी सुधारणा होईल, पण बुमराहलाही दुसऱ्या टोकाहून मदत करणाऱ्या साथीदारांची गरज आहे.

टीम इंडियाला मोहम्मद शमीची गरज

T20 मध्ये शेवटच्या चार षटकांमध्ये सर्वात महागड्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत प्रथम दिसणारी दोन नावे T20 विश्वचषकच्या संघाचा भाग आहेत. डेथ बॉलर म्हणून हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार हे चांगले पर्याय नाहीत. शमी हा T20 विश्वचषक संघाचा भाग आहे, परंतु तो स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत आहे. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाला थोडासा दिलासा मिळाला आहे. पण दुसऱ्या एंडकडून शमीपेक्षा चांगला जोडीदार सध्यातरी टीम इंडियात नाही.

डेथ ओव्हर्समध्ये हर्षल पटेल सर्वात वाईट गोलंदाज

टी-२० मध्ये डेथ ओव्हर्समध्ये सर्वात महागड्या गोलंदाजांच्या यादीत हर्षल पटेल क्रमांक एकवर आहे. तो डेथ ओव्हर्समध्ये ११.५० च्या इकॉनॉमी रेटने धावा देतो. तर भुवनेश्वर कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. भुवीने डेथ ओव्हर्समध्ये ९.४० च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.