मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS: दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियात मोठा बदल, बुमराह खेळणार, ‘हा’ दिग्गज बाहेर
jasprit bumrah
jasprit bumrah

IND vs AUS: दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियात मोठा बदल, बुमराह खेळणार, ‘हा’ दिग्गज बाहेर

22 September 2022, 14:41 ISTRohit Bibhishan Jetnavare

jasprit bumrah will replace umesh yadav: भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-20 मध्ये उमेश यादवच्या जागी बुमराहला प्लेइंग-११ मध्ये सामील केले जाईल. भुवनेश्वर आणि हर्षल पटेल यांना संघात कायम ठेवण्यात येणार आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या (२३ सप्टेंबर) नागपुरात होणार आहे. या निर्णायक सामन्यासाठी (IND vs AUS) टीम इंडियामध्ये एक बदल निश्चित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला आहे. तो प्लेइंग-११ मध्ये खेळणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत प्रदीर्घ कालावधीनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या उमेश यादवला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका रिपोर्टनुसार, भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-20 मध्ये उमेश यादवच्या जागी बुमराहला प्लेइंग-११ मध्ये सामील केले जाईल. भुवनेश्वर आणि हर्षल पटेल यांना संघात कायम ठेवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये उमेश यादवसह भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनीही धावा खूप दिल्या होत्या.

मोहालीत झालेल्या टी-20 मध्ये उमेश यादवने दोन षटकात २७ धावा दिल्या. मात्र, त्याने आपल्या दुसऱ्या षटकात स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांची विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले होते. याउलट हर्षल पटेलने ४ षटकांत ४९ धावा आणि भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत ५१ धावा दिल्या होत्या. या दोन्ही वेगवान गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही.

भारतासाठी 'करा किंवा मरो'चा सामना

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने ४ विकेटने गमावला होता. टीम इंडियाला २०८ धावसंख्येचा बचावही करता आला नाही. आता या मालिकेतील पुढील सामना नागपुरात होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना 'करा किंवा मरो'चा असेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा प्रयत्न या सामन्यात विजय मिळवण्यावर असणार आहे.

अशी असू शकते प्लेइंग-११: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.