मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik: एखाद्या गोलंदाजाला जखमी करा अन् उमरानला घ्या, या दिग्गज काँग्रेस नेत्याचं ट्वीट चर्चेत

Umran Malik: एखाद्या गोलंदाजाला जखमी करा अन् उमरानला घ्या, या दिग्गज काँग्रेस नेत्याचं ट्वीट चर्चेत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2022 04:46 PM IST

abhishek manu singhvi on team india: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ४ विकेट्सनी पराभव झाला. भारतीय बॉलिंग युनिट या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरली. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी याबाबत ट्विट केले आहे. वर्ल्ड कपसाठी बुमराह-शमी खूप महत्वाचे आहेत, असे सिंघवी म्हणाले आहेत.

Umran Malik
Umran Malik

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारतीय संघाच्या रणनीतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनीही टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोबतच सिंघवी यांनी काही सूचनाही केल्या आहेत.

अभिषेक मनू सिंघवी काय म्हणाले

अभिषेक मनू सिंघवी क्रिकेटचे चाहते आहेत. ते सतत क्रिकेट संबंधित ट्विट करत असतात. मोहाली T20 नंतर या काँग्रेस नेत्याने लिहिले आहे की, “टीम इंडियाने हे लक्षात ठेवावे की त्यांना T20 वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीची नितांत गरज भासणार आहे. मोहालीत ज्या प्रकारची खेळपट्टी पाहायला मिळाली, तशीच खेळपट्टी ऑस्ट्रेलियात असणार आहे. त्यामुळे गोलंदाजीत अतिरिक्त वेगाची गरज आहे”.

तसेच, “एखाद्या खेळाडूला दुखापतग्रस्त जाहीर करुन उमरान मलिकला टी-20 विश्वचषकासाठी संघात आणले जाऊ शकते”. अभिषेक मनु सिंघवी यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे आणि ट्विटरवर व्हायरल झाले आहे.

दरम्यान, वर्ल्डकपसाठीच्या संघात टीम इंडियाने जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांसारखे वेगवान गोलंदाज निवडले आहेत. तर मोहम्मद शमीला राखीव ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी शमीला कोरोना झाला होता, अशा परिस्थितीत त्याच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच भारताची वेगवान गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे.

भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी

पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य ६ गडी गमावून१ १९.२ षटकांत पूर्ण केले.

२०९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी लाजिरवाणी कामगिरी केली. टीम इंडियाचा स्ट्राईक बॉलर भुवनेश्वर कुमारने ४ ओव्हरमध्ये ५२ रन्स दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. युझवेंद्र चहलच्या बाबतीतही तसेच झाले, चहलने केवळ ३.२ षटकात ४२ धावा दिल्या. तर प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या हर्षल पटेलने ४ षटकात ४९ धावा दिल्या.

WhatsApp channel

संबंधित बातम्या