मराठी बातम्या  /  क्रीडा  /  The Great Khali: टोल नाक्यावर खलीचा राडा, कर्मचाऱ्याला लगावली थप्पड; VIDEO

The Great Khali: टोल नाक्यावर खलीचा राडा, कर्मचाऱ्याला लगावली थप्पड; VIDEO

Jul 12, 2022, 02:33 PM IST

    • खलीने ओळखपत्र मागितल्यामुळे वाद निर्माण केल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे. त्याचवेळी एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी जबरदस्तीने कारमध्ये घुसत होता, असे खलीचे म्हणणे आहे. 
The Great Khali

खलीने ओळखपत्र मागितल्यामुळे वाद निर्माण केल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे. त्याचवेळी एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी जबरदस्तीने कारमध्ये घुसत होता, असे खलीचे म्हणणे आहे.

    • खलीने ओळखपत्र मागितल्यामुळे वाद निर्माण केल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे. त्याचवेळी एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी जबरदस्तीने कारमध्ये घुसत होता, असे खलीचे म्हणणे आहे. 

WWE चॅम्पियन 'द ग्रेट खली' अर्थात दलीप सिंग राणा वादात सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो टोल प्लाझावर टोल कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसत आहे. एवढेच नाही तर खलीवर टोल कर्मचाऱ्याला थप्पड मारल्याचा आरोप देखील लावण्यात आलाआहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

खलीला ओळखपत्र मागितल्यामुळे त्याने हा वाद निर्माण केल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे. तर एक टोल कर्मचारी फोटो काढण्यासाठी जबरदस्तीने कारमध्ये घुसत होता, असे खलीचे म्हणणे आहे. त्यामुळे ही घटना घडली. तसेच, व्हिडीओमध्ये खली कर्मचाऱ्यावर ब्लॅकमेल केल्याचाही आरोप करताना दिसत आहे.

ही घटना ११ जुलै रोजीची आहे, जेव्हा खली जालंधरहून कर्नालला जात होता. हा व्हिडिओ फिल्लोरजवळील टोल प्लाझाचा आहे.

या वादानंतर खली म्हणाला की, “एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी कारमध्ये शिरला होता. मी फोटोसाठी नकार दिल्याने वाद झाला. यानंतर बाकीचे कर्मचारी आले आणि त्यांनी आमच्या गाडीला घेराव घातला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली”.

यानंतर खली आपल्या कारमधून बाहेर आला आणि त्याने बॅरिकेड्स काढून तिथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका कर्मचाऱ्याने खलीला बॅरिकेड्स काढण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. त्यानंतर खलीने त्याला पकडून बाजूला केले. ही घटना व्हिडीओमध्येही कैद झाली आहे. खली हा भारतीय जनता पक्षाचा (BJP) नेता देखील आहे.

त्याचवेळी, कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे की, त्याने खलीला फक्त ओळखपत्र मागितले. यावर खलीने त्याला थप्पड मारली. व्हिडीओमध्ये एक कर्मचारी खलीला माकड म्हणत असल्याचे ऐकू येते. संतप्त कर्मचारी खलीला तेथून जाऊ देत नव्हते. मात्र, यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

 

विभाग