मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson: संघ निवडताना राजकारण? संजू सॅमसन सोशल मीडियावर ट्रेंड, चाहत्यांचा BCCI वर संताप

Sanju Samson: संघ निवडताना राजकारण? संजू सॅमसन सोशल मीडियावर ट्रेंड, चाहत्यांचा BCCI वर संताप

Sep 12, 2022, 08:37 PM IST

    • T20 World Cup 2022 India Squad sanju samson vs rishabh pant: टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात संजू सॅमसनला स्थान मिळालेले नाही. आशिया चषकातही संजूचा विचार केला गेला नव्हता. मात्र, आशिया चषकात फ्लॉप ठरुनही ऋषभ पंतला वर्ल्डकपच्या संघात संधी देण्यात आली आहे. यामुळे भारतीय क्रिकटे चाहत्यांनी BCCI वर संताप व्यक्त केला आहे.
T20 World Cup

T20 World Cup 2022 India Squad sanju samson vs rishabh pant: टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात संजू सॅमसनला स्थान मिळालेले नाही. आशिया चषकातही संजूचा विचार केला गेला नव्हता. मात्र, आशिया चषकात फ्लॉप ठरुनही ऋषभ पंतला वर्ल्डकपच्या संघात संधी देण्यात आली आहे. यामुळे भारतीय क्रिकटे चाहत्यांनी BCCI वर संताप व्यक्त केला आहे.

    • T20 World Cup 2022 India Squad sanju samson vs rishabh pant: टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात संजू सॅमसनला स्थान मिळालेले नाही. आशिया चषकातही संजूचा विचार केला गेला नव्हता. मात्र, आशिया चषकात फ्लॉप ठरुनही ऋषभ पंतला वर्ल्डकपच्या संघात संधी देण्यात आली आहे. यामुळे भारतीय क्रिकटे चाहत्यांनी BCCI वर संताप व्यक्त केला आहे.

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया चषकात अत्यंत खराब कामगिरी केलेली असताना देखील यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची संघात निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी, संजू सॅमसनला T20 WC संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

आशिया चषकात ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकात संजू सॅमसनला सामील करण्याची मागणी होत होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे संघाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांची निराशा झाली. आता चाहते सोशल मीडियावर या गोष्टीचा राग काढत आहेत. या दोन्ही खेळाडूंचे आकडे शेअर करत चाहते BCCI वर संताप व्यक्त करत आहेत.

सोबतच, पंत हा आशिया चषकातील पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. त्यावेळीही संजू सोशल मीडियावर ट्विटरवर ट्रेंड करत होता. तशीच परिस्थिती वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा झाल्यानंतरही आहे. संजू सॅमसन ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

दोन्ही खेळाडूंची आकडेवारी

ऋषभ पंतने आतापर्यंत ५७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अवघ्या २३.४३ च्या सरासरीने आणि १२६.२४ च्या स्ट्राइक रेटने ९१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर संजू सॅमसनने आतापर्यंत केवळ १६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने २१.१४ च्या सरासरीने आणि १३५ च्या स्ट्राईक रेटने २९६ धावा केल्या आहेत. संजू सॅमसनला ऋषभ पंत इतक्या संधी मिळालेल्या नाहीत. याचाही राग चाहत्यांच्या मनात आहे.

दोघांना मिळालेली संधी आणि आकडेवारी पाहिल्यानंतर संजू सॅमसन हा T20 क्रिकेटमध्ये एक चांगला पर्याय आहे. तर पंत हा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगला खेळाडू आहे.