मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India Vice Captain : टीम इंडियाचा नवा उपकर्णधार कोण? बीसीसीआयने रोहित शर्मावर सोपवला निर्णय

Team India Vice Captain : टीम इंडियाचा नवा उपकर्णधार कोण? बीसीसीआयने रोहित शर्मावर सोपवला निर्णय

Feb 20, 2023, 12:30 PM IST

  • Indian Test team Vice Captain : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामने इंदूर आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील. यासाठी संघाची निवडदेखील करण्यात आली आहे.

Team India new Vice Captain

Indian Test team Vice Captain : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामने इंदूर आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील. यासाठी संघाची निवडदेखील करण्यात आली आहे.

  • Indian Test team Vice Captain : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामने इंदूर आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील. यासाठी संघाची निवडदेखील करण्यात आली आहे.

Rohit Sharma Will Dicide Test Vice Captain : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, बीसीसीआयने केएल राहुलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक राहुलला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी राहुलचा उपकर्णधार म्हणून संघात समावेश करण्यात आला होता.  

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आल्यानंतर आता टीम इंडियाचा नवा उपकर्णधार कोण असेल? या चर्चेला उधाण आले आहे. 

रोहित घेणार निर्णय?

दरम्यान, एका वृत्तपत्राशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, "कोणालाही उपकर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण रोहित जेव्हा मैदानावर नसेल त्यावेळी संघाची धुरा कोण सांभाळेल, याचा निर्णय खुद्द रोहितनेच घ्यायचा आहे. " 

राहुल सतत फ्लॉप

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर केएल राहुल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या एक वर्षापासून त्याला कसोटी सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही. आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या वर्षभरात त्याला एकाही कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावता आलेले नाही. गेल्या ५ कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुल एकाही डावात २३ पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्याने शेवटचे कसोटी अर्धशतक जानेवारी २०२२ मध्ये केले होते. त्यावेळी त्याने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५० धावा केल्या होत्या. तेव्हापासून तो कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप ठरला आहे.