मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suryakumar Yadav Century : वानखेडेवर सुर्याचीच हवा, शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक केलं पूर्ण

Suryakumar Yadav Century : वानखेडेवर सुर्याचीच हवा, शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक केलं पूर्ण

May 12, 2023, 09:32 PM IST

    • Suryakumar Yadav Century VS GT highlights : सूर्यकुमार यादवने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले.
Suryakumar Yadav Century vs GT

Suryakumar Yadav Century VS GT highlights : सूर्यकुमार यादवने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले.

    • Suryakumar Yadav Century VS GT highlights : सूर्यकुमार यादवने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले.

Suryakumar Yadav Century vs GT : आयपीएल 2023 मध्ये आज (१२ एप्रिल) मुंबई इंडियन्सचा (MI) सामना गुजरात टायटन्सशी (GT) होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २१८ धावा केल्या आहेत. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. सूर्याशिवाय ईशान किशन, विष्णू विनोद आणि रोहित शर्मा यांनीही मुंबईसाठी उपयुक्त खेळी खेळली.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

सूर्याने ४९ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी केली. त्याने अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून शतक पूर्ण केले. सूर्याचे हे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

पॉवरप्लेमध्ये बिनबाद ६१ धावा

या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पॉवरप्लेमध्ये मिळून ६१ धावा जोडल्या. मात्र, यानंतर रशीद खानने ७व्या षटकात मुंबईच्या सलामीच्या जोडीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रशीदने रोहित शर्माला राहुल तेवतियाकरवी झेलबाद केले. रोहितने १८ चेंडूत २९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले.

सुर्याची फटकेबाजी

यानंतर सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोद यांच्यात चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी झाली. १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुंबईची चौथी विकेट पडली. मोहित शर्माने विष्णू विनोदला अभिनव मनोहरकरवी झेलबाद केले. विनोदने २० चेंडूत ३० धावा केल्या. पुढच्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिड बाद झाला. त्याने ३ चेंडूत ५ धावा केल्या. राशिद खानने त्याला बाद केले. शेवटी सूर्या ४९ चेंडूत १०३ धावा करून नाबाद राहिला आणि कॅमेरून ग्रीनने ३ चेंडूत ३ धावा केल्या.