मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final 2023 : श्रेयस अय्यर WTC फायनलमधून बाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का

WTC Final 2023 : श्रेयस अय्यर WTC फायनलमधून बाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का

Apr 04, 2023, 07:16 PM IST

    • Shreyas Iyer Ruled Out : दुखापतीमुळं श्रेयर अय्यर हा आयपीएलसह डब्ल्यूटीसीतूनही बाहेर झाला आहे. त्यामुळं आता आयपीएल सुरू असतानाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Shreyas Iyer Ruled Out In WTC Final 2023 (AFP)

Shreyas Iyer Ruled Out : दुखापतीमुळं श्रेयर अय्यर हा आयपीएलसह डब्ल्यूटीसीतूनही बाहेर झाला आहे. त्यामुळं आता आयपीएल सुरू असतानाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

    • Shreyas Iyer Ruled Out : दुखापतीमुळं श्रेयर अय्यर हा आयपीएलसह डब्ल्यूटीसीतूनही बाहेर झाला आहे. त्यामुळं आता आयपीएल सुरू असतानाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Shreyas Iyer Ruled Out In WTC Final 2023 : आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच आता टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण भारताचा मधल्या फळीतील तडाखेबंद फलंदाज श्रेयस अय्यर वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर झाला आहे. अय्यरला सराव सामन्यात दुखापत झाली होती, त्यानंतर आता त्याच्यावर एक शस्त्रक्रिया केली जाणार असल्यामुळं तो डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये खेळू शकणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळं आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

येत्या जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. परंतु दुखापत झाल्यानंतर श्रेयस अय्यर मे महिन्याच्या अखेरपर्यंत खेळण्यास उपलब्ध होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु आता तो आयपीएलसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधूनही बाहेर झाला आहे. त्यामुळं आता बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या मधल्या फळीत कोणत्या खेळाडूला संधी दिली जाईल, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पाठिच्या सर्जरीसाठी बीसीसीआयकडून श्रेयस अय्यरला परदेशात पाठवण्यात येणार असून त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे.

भारताचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त...

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं गेल्या अनेक महिन्यांपासून संघाबाहेर आहे. कार अपघातामुळं गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर मुंबईत उपचार सुरू आहे. त्यानंतर आता श्रेयस अय्यरही संघातून बाहेर झाल्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये भारताची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळं या बुमराह, पंत आणि अय्यर हे दुखापतीतून सावरून लवकर मैदानात परतण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न केले जात आहे.