मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Yash Thakur : केएल राहुलच्या लखनौला मिळाला नवा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट; स्विंग गोलंदाजीनं बॅट्समन घायाळ

Yash Thakur : केएल राहुलच्या लखनौला मिळाला नवा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट; स्विंग गोलंदाजीनं बॅट्समन घायाळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 04, 2023 06:10 PM IST

Lucknow Super Giants In IPL 2023 : मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या गोलंदाजाला लखनौने संधी दिली आहे. त्यामुळं आता केएल राहुलचं डेथ ओव्हरमधील टेन्शन मिटलं आहे.

Lucknow Super Giants In IPL 2023
Lucknow Super Giants In IPL 2023 (AFP)

Who Is Yash Thakur : चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळं निराश झालेल्या एलएसजीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता लखनौच्या संघात तुफान स्विंग गोलंदाजी करणाऱ्या यश ठाकुरचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक संघाला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीचं टेन्शन असतं. परंतु आता यश ठाकूर हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज मानला जातो. त्यामुळं आता यश ठाकुरचा लखनौच्या संघात समावेश करण्यात आल्यामुळं केएल राहुलचं टेन्शन मिटलं आहे.

कोण आहे यश ठाकूर?

वेगवान गोलंदाज असलेल्या यश ठाकुरने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये स्विंग गोलंदाजीची चांगलीच झलक दाखवलेली आहे. त्यामुळं आता त्याचा लखनौच्या संघात समावेश झाल्यामुळं प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये गुंडाळण्यात केएल राहुलला यश येण्याची शक्यता आहे. यश ठाकुरला चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात लखनौनं संधी दिली आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याला वीकेट मिळाल्या नसल्या तरी त्यानं आपल्या स्विंग गोलंदाजीमुळं अनेकांना प्रभावित केलं आहे. त्यामुळं आता यश ठाकुरच्या कौशल्याचा लखनौला पुढील सामन्यांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

यश ठाकुरने प्रथम श्रेणीच्या १३ सामन्यांमध्ये ३७ वीकेट घेतल्या आहेत. यात त्यानं पाचवेळी चार बळींचा आकडा गाठला आहे. याशिवाय एका वेळेस त्यानं पाच बळी देखील घेतलेले आहे. प्रथम श्रेणीच्या क्रिकेट सामन्यांमध्ये यश ठाकूर ३८ टी-ट्वेंटी सामने खेळला असून त्यात त्याने ५५ वीकेड काढल्या आहे. त्यामुळं आता लखनौ सुपर जायंट्सला यश ठाकुरकडून आयपीएलच्या आगामी सामन्यांमध्ये मोठ्या आशा आहे.

WhatsApp channel