मराठी बातम्या  /  क्रीडा  /  DC vs GT IPL Live Score : घरच्या मैदानावर दिल्लीची दाणादाण, गुजरातचा सलग दुसरा विजय

DC vs GT IPL Live Score : घरच्या मैदानावर दिल्लीची दाणादाण, गुजरातचा सलग दुसरा विजय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 04, 2023 11:27 PM IST

DC vs GT IPL 2023 Live Scorecard : हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने १८.१ षटकांत चार गडी गमावत १६३ धावांचं लक्ष्य गाठत आयपीएलमधील सलग दुसरा विजय मिळवला आहे.

Delhi Capitals vs Gujarat Titans Match Live Score
Delhi Capitals vs Gujarat Titans Match Live Score (HT)

Delhi Capitals vs Gujarat Titans Match Live Score : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने बाजी मारली आहे. साई सुदर्शन, विजय शंकर आणि डेव्हिड मिलरने केलेल्या फटकेबाजीमुळं गुजरातने दिल्लीवर सहा गड्यांनी विजय मिळवला आहे. गुजरातचा आयपीएलमधील सलग दुसरा विजय आहे. तर दिल्लीला दुसऱ्यांदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

 

  • साई सुदर्शनच्या ६२ आणि डेव्हिड मिलरच्या ३१ धावांच्या बळावर गुजरातनं दिल्लीवर विजय मिळवला आहे.
  • घरच्या मैदानावर दिल्लीची दाणादाण, गुजरातचा सलग दुसरा विजय
  • गुजरातचा स्कोर- १९ षटकांत १६१ धावा, चार वीकेट
  • साई सुदर्शनचं शानदार अर्धशतक, डेव्हिड मिलरची तुफान फटकेबाजी
  • सुदर्शन आणि मिलरची तुफान फटकेबाजी, गुजरात टायटन्स विजयाच्या दिशेने
  • विजय शंकर आणि सुदर्शनने डाव सावरला, गुजरातच्या ११ षटकांत ९० धावा
  • हार्दिक पांड्या ५ धावांवर बाद झाला आहे. खलील अहमदने त्याला कटआउट केलं आहे.
  • दिल्लीच्या नॉर्कियाने २ षटकांत २० धावा देत दोन गडी बाद केले आहे.
  • गुजरात टायटन्सच्या डावाची तडाखेबाज सुरुवात झाली आहे. साई सुदर्शन १७ (१३) तर हार्दिक पांड्या ५ धावांवर खेळत आहे.
  • वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी १४ धावांचं योगदान दिलं आहे.
  • गुजरातची गाडी सुपरफास्ट, पाच ओव्हरमध्ये ५३ धावा, दोन गडी बाद
  • गुजरातला पहिला धक्का सलामीवीर वृद्धीमान साहा ७ चेंडूत १४ धावा ठोकून तंबूत.  गुजरातच्या ३ षटकात १ बाद ३० धावा.
  • दिल्लीने गुजरातसमोर विजयासाठी १६३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
  • अक्षर पटेलनं अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळं दिल्लीला सन्मानजनक स्कोर करता आला आहे.
  • अक्षर पटेलने २१ चेंडूत ३६ धावा ठोकल्या आहेत.
  • ठराविक अंतरानं फलंदाज बाद होत असताना अक्षर पटेलने मात्र गुजरातच्या फलंदाजांना घाम फोडला आहे.
  • दिल्लीचा स्कोर : दिल्लीनं १९ व्या षटकाअखेर १५० धावा करत सात गडी गमावले आहे.
  • दिल्लीचा स्कोर : १७.४ षटकांत १४१ धावांवर सहा गडी बाद झाले आहे.
  • दिल्लीचा गडगडलेला डाव अक्षर पटेलने सावरला आहे. त्याला अमान खानची मोलाची साथ मिळत आहे.
  • दिल्लीचा स्कोर : १२.२ षटकांत १०१ धावांवर पाच गडी बाद झाले आहे.
  • गुजरात टायन्सच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची फलंदाजी कोसळली आहे.
  • आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे पृथ्वी शॉ ७ (५), मिशेल मार्श ४ (४), डेव्हिड वॉर्नर ३७ (३२) धावांवर तर रायली रुसो शून्यावर बाद झाला आहे.
  • गुजरातच्या घातक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या आहे. ६७ धावांवर चार बॅट्समन बाद झाल्यामुळं दिल्लीचा डाव गडगडला आहे.
  • दिल्लीला तिसरा झटका, जोसेफने वॉर्नरच्या दांड्या उडवल्या
  • कर्णधार डेव्हिड वॉर्नर २५ (२२) धावांवर तर सरफराज खान २ (५) धावांवर खेळत आहे.
  • सहा षटकांनंतर दिल्लीनं ५२ धावांवर दोन गडी गमावले.
  • मिशेल मार्श चार धावांवर क्लिन बोल्ड, दिल्लीची दुसरी वीकेट पडली, शमीची घातक गोलंदाजी
  • दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर १२ (१२) धावांवर खेळत आहे. तर शॉ बाद झाल्यानंतर मिशेल मार्श फलंदाजीसाठी आला आहे.
  • दिल्ली कॅपिटल्सने तीन षटकांत एक गडी गमावत २९ धावा केल्या आहे.
  • दिल्लीच्या डावाची सुरुवात खराब झाली आहे. गुजरातच्या मोहम्मद शमीनं पृथ्वी शॉ ला स्वस्तात बाद केलं आहे.
  • दिल्ली कॅपिटल्सने एनरिक नॉर्खिया आणि अभिषेक पोरेल यांना संधी दिली आहे. तर गुजरातकडून डेविड मिलरची एन्ट्री झाली आहे.
  • टॉस जिंकून हार्दिक पांड्यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • DC vs GT IPL Live Score : थोड्याच वेळात टॉस होणार
  • Gujarat Titans Playing XI : गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग ११
  • हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि श्रीकर भरत
  • Delhi Capitals Playing XI : दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग ११
  • डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ललित यादव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद आणि मुकेश कुमार
  • गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये आयपीलचा सातवा सामना आज संध्याकाळी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे.
  • आयपीएल २०२३ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समध्ये लढत रंगणार आहे. टॉस झाल्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे.

WhatsApp channel