मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sachin Tendulkar : दम है तो मेरी गेंदों पर छक्के मार; १६ वर्षीय सचिनला अब्दुल कादिरनं दिलं होतं चॅलेंज, पुढं काय घडलं?

Sachin Tendulkar : दम है तो मेरी गेंदों पर छक्के मार; १६ वर्षीय सचिनला अब्दुल कादिरनं दिलं होतं चॅलेंज, पुढं काय घडलं?

Apr 24, 2023, 10:03 AM IST

    • Sachin Tendulkar 50th Birthday Special : १६ वर्षीय सचिन तेंडुलकरला १९८९ साली पाकिस्तानचा दिग्गज लेगस्पिनर अब्दुल कादिरने चॅलेंज दिले होते. कादिरच्या आव्हानाला बॅटने उत्तर देताना सचिनने त्याच्या एका षटकात चार षटकार ठोकले होते.
Sachin Tendulkar 50th Birthday

Sachin Tendulkar 50th Birthday Special : १६ वर्षीय सचिन तेंडुलकरला १९८९ साली पाकिस्तानचा दिग्गज लेगस्पिनर अब्दुल कादिरने चॅलेंज दिले होते. कादिरच्या आव्हानाला बॅटने उत्तर देताना सचिनने त्याच्या एका षटकात चार षटकार ठोकले होते.

    • Sachin Tendulkar 50th Birthday Special : १६ वर्षीय सचिन तेंडुलकरला १९८९ साली पाकिस्तानचा दिग्गज लेगस्पिनर अब्दुल कादिरने चॅलेंज दिले होते. कादिरच्या आव्हानाला बॅटने उत्तर देताना सचिनने त्याच्या एका षटकात चार षटकार ठोकले होते.

Sachin Tendulkar 50th Birthday Special : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (२४ एप्रिल) ५० व्या वर्षात (happy birthday Sachin Tendulkar) पदार्पण करत आहेत. सचिन नेहमीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशहा राहिला आहे. त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त पाकिस्तानचा दिग्गज फिरकीपटू अब्दुल कादिरसोबतचा (abdul qadir) एक रंजक किस्सा सांगणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

१९८९ मध्ये सचिन तेंडुलकरने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्यावेळी १६ वर्षीय सचिनला जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवायला तयार होता. पेशावरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळला जात होता. त्या सामन्यात पाकिस्तानचा महान लेगस्पिनर अब्दुल कादिरने त्या १६ वर्षाच्या मुलाला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर १६ वर्षांच्या सचिनने जे केले ते सर्वांसमोर आहे.

अब्दुल कादिरने सचिनला चॅलेंज दिले होते

वास्तविक, १६ वर्षीय सचिन तेंडुलकर फलंदाजी करत होता आणि त्याने मुश्ताक अहमदच्या षटकात दोन षटकार ठोकले. सचिनचे हे षटकार पाहून अब्दुल कादिर भडकला आणि त्याने भारताच्या युवा फलंदाजाला आव्हान दिले. कादिर सचिनला म्हणाला, "बच्चे को क्या छक्के मार रहा है, हिम्मत असेल तर मला सिक्स मारून दाखव."

सचिनने षटकात चार षटकार मारले

सचिन त्यावेळी अब्दुल कादिरसमोर काहीच बोलला नाही, पण मनातल्या मनात १६ वर्षांच्या सचिनने दिग्गज फिरकीपटूचे आव्हान स्वीकारले होते. यानंतर सचिनच्या पुढच्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या अब्दुल कादिरला सचिनने ४ षटकार मारले. यातील ३ षटकार सचिनने लागोपाठच्या चेंडूंवर ठोकले.

यानंतर अब्दुल कादिर सचिनचे कट्टर चाहते झाले

१६ वर्षीय सचिनची धमाकेदार फलंदाजी पाहून अब्दुल कादिर सचिनचा कट्टर चाहता झाला. सचिनची फलंदाजी पाहून कादिरने टाळ्याही वाजवल्या होत्या. सचिनच्या कारकिर्दीतील हा तो क्षण होता, ज्याने त्याला जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख दिली. या सामन्यात पाकिस्तानी चाहत्यांनी सचिनची आणि त्याच्या वयाची खिल्ली उडवली, पण या सगळ्याच्या पलीकडे एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी त्या दिवशी १६ वर्षांचा सचिन मैदानात उतरला होता.