मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB Vs MI wpl 2023 : मुंबईच्या हीली मॅथ्यूजची तुफानी फलंदाजी, मानधनाच्या आरसीबीचा सलग दुसरा पराभव

RCB Vs MI wpl 2023 : मुंबईच्या हीली मॅथ्यूजची तुफानी फलंदाजी, मानधनाच्या आरसीबीचा सलग दुसरा पराभव

Mar 06, 2023, 10:40 PM IST

    • RCB Vs MI wpl 2023 highlights : महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज (६ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ९ विकेट्सनी विजय मिळवला. हा मुंबईचा सलग दुसरा विजय आहे.
RCB Vs MI wpl 2023 highlights

RCB Vs MI wpl 2023 highlights : महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज (६ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ९ विकेट्सनी विजय मिळवला. हा मुंबईचा सलग दुसरा विजय आहे.

    • RCB Vs MI wpl 2023 highlights : महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज (६ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ९ विकेट्सनी विजय मिळवला. हा मुंबईचा सलग दुसरा विजय आहे.

Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians WPL highlights : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ९ गडी राखून पराभव केला. मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईचे दोन सामन्यांनंतर चार गुण झाले आहेत, तर आरसीबीने सलग दुसरा सामना गमावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईने एक गडी गमावून आणि केवळ १४.२ षटकांत लक्ष्य गाठले. मुंबईकडून हिली मॅथ्यूजने सर्वाधिक नाबाद ७७ धावा केल्या. त्याचवेळी नॅट सीव्हरने ५५ धावांची नाबाद खेळी केली.

मॅथ्यूजने ३८ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकार ठोकला तर सीव्हर ब्रंटने २९ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्यापूर्वी, १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. यास्तिका भाटिया आणि हीली मॅथ्यूज या सलामी जोडीने ४ षटकांत ४५ धावांची सलामी दिली. यास्तिका भाटिया १९ चेंडूत २३ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत ४ चौकार मारले. प्रिती बोसने तिला पायचीत केले. 

त्यानंतर मात्र, मुंबईची एकही विकेट पडली नाही. हीली मॅथ्यूज आणि नॅट सीव्हर ब्रंट यांच्यात शतकी भागीदारी झाली. दोघींनी वेगाने धावा केल्या. 

आरसीबीचा डाव

तत्पूर्वी, आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात चांगली झाली. सोफी डेव्हाईन आणि कर्णधार स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर संघ ४ धावांत ४ विकेट गमावून बॅकफूटवर आला. सायका इशाक आणि हीदर नाइट यांनी प्रत्येकी २ विकेट घेत सामन्यात मुंबईची पकड मजबूत केली.

मात्र, यानंतरही आरसीबीच्या फलंदाजांनी मोठे फटके खेळणे सुरूच ठेवले. रिचा घोष २६ चेंडूत २८, कनिका आहुजाने १३ चेंडूत २२, श्रेयंका पाटीलने १५ चेंडूत २३ धावा केल्या. अखेरीस, मेगन शुटने १४ चेंडूत २० धावा करत संघाची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली.

मुंबईकडून हिली मॅथ्यूजने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याचवेळी सायका इशाक आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. नॅट सीव्हर आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी १ गडी बाद केला.