मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB Vs DC Highlights : शेफाली-लॅनिंगच्या वादळानंतर नॉरीसची धारदार गोलंदाजी, दिल्लीचा शानदार विजय

RCB Vs DC Highlights : शेफाली-लॅनिंगच्या वादळानंतर नॉरीसची धारदार गोलंदाजी, दिल्लीचा शानदार विजय

Mar 05, 2023, 07:16 PM IST

    • RCB W vs DC W Score WPL 2023 : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. या सामन्यात दिल्लीने शानदार विजय मिळवला.
RCB Vs DC Highlights

RCB W vs DC W Score WPL 2023 : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. या सामन्यात दिल्लीने शानदार विजय मिळवला.

    • RCB W vs DC W Score WPL 2023 : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. या सामन्यात दिल्लीने शानदार विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमध्ये आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा ६० धावांनी पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

RCB संघ आता याच मैदानावर उद्या सोमवारी (६ मार्च) त्यांच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. मुंबईने पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, दिल्ली संघ मंगळवारी (७ मार्च) डीवाय पाटील स्टेडियमवर यूपी वॉरियर्सला भिडणार आहे.

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय साफ चुकीचा ठरला. कारण दिल्लीने २० षटकांत २ बाद २२३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६३ धावाच करू शकला.

२२४ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली. मात्र, सोफी डिव्हाईन बाद झाल्यानंतर संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही.

आरसीबीकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक ३५ धावा केल्या. हीदर नाइटने ३४, अॅलिस पॅरीने ३१ आणि मेगन शुटने नाबाद ३० धावा केल्या. सोफी डिव्हाईनने १४ धावांचे योगदान दिले. दिशा कासट नऊ, रिचा घोष आणि आशा शोभना प्रत्येकी दोन धावा करून बाद झाल्या.

दिल्ली कॅपिटल्सकडून अमेरिकेच्या तारा नॉरिसने सर्वाधिक ५ बळी घेतले. एलिस कॅप्सीने २ गडी बाद केले. शिखा पांडेला १ विकेट मिळाला.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

टॉस हरल्यानंतर शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी दिल्लीसाठी शानदार कामगिरी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ९१ चेंडूत १६२ धावांची भागीदारी केली. शेफाली ४५ चेंडूत ८४ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले. कर्णधार मेग लॅनिंगने ४३ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. तिने १४ चौकार मारले. १६३ धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव मारिजन कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी सांभाळला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत ६० धावांची नाबाद भागीदारी केली. मारिजन कॅप १७ चेंडूत ३९ आणि जेमिमा रॉड्रिग्जने १५ चेंडूत २२ धावा केल्या. कॅपने ३ चौकार आणि ३ षटकार मारले.

आरसीबीकडून हेदर नाइटने दोन्ही विकेट घेतल्या.