मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI vs PCB : लक्षात ठेवा, हे प्रकरण आशिया चषकापुरतं मर्यादित नाही; पीसीबीची बीसीसीआयला धमकी

BCCI vs PCB : लक्षात ठेवा, हे प्रकरण आशिया चषकापुरतं मर्यादित नाही; पीसीबीची बीसीसीआयला धमकी

Mar 14, 2023, 11:54 AM IST

  • asia cup 2023 india vs pakisatn : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी या वर्षी पाकिस्तानमध्ये होणार्‍या आशिया चषक आणि भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाबाबत लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. 

BCCI vs PCB

asia cup 2023 india vs pakisatn : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी या वर्षी पाकिस्तानमध्ये होणार्‍या आशिया चषक आणि भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाबाबत लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

  • asia cup 2023 india vs pakisatn : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी या वर्षी पाकिस्तानमध्ये होणार्‍या आशिया चषक आणि भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाबाबत लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. 

भारतीय क्रिकेट संघ आगामी आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या पुढील बैठकीत आपण हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचेही सेठी यांनी सांगितले आहे.

पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी सोमवारी (१३ मार्च) पत्रकार परिषद घेतली. यात ते बोलताना म्हणाले की,, 'आमच्यासमोर गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, पण जेव्हा मी एसीसी आणि आयसीसीच्या बैठकीत जाईन तेव्हा मला सर्व पर्याय खुले ठेवावे लागतील. मात्र, आपण आता परिस्थिती स्पष्ट केली पाहिजे. आशिया चषक स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानला न पाठवण्याच्या भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असेही ते म्हणाले. जर भारतीय संघ आशिया चषकासाठी आपल्या देशाचा दौरा करणार नसेल तर पाकिस्तान संघालाही एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात न पाठवण्याचा विचार करावा लागेल, असेही सेठी म्हणाले.

इतर संघ येत आहेत, मग भारताला सुरक्षेची चिंता का ?

सोबतच, “मी माझे पर्याय खुले ठेवले आहेत कारण जेव्हा सर्व संघ पाकिस्तानमध्ये येत आहेत आणि सुरक्षेचा प्रश्न नाही, तेव्हा भारताला सुरक्षेची चिंता का आहे? मी आगामी मीटिंगमध्ये हे अधोरेखित करेन की जर भारताला समस्या असेल तर आमच्या संघालाही भारतात विश्वचषकादरम्यान सुरक्षेची चिंता आहे. या महिन्यात आयसीसीचे सीईओ आणि कार्यकारी मंडळाच्या बैठका होणार आहेत. सेठी आणि पीसीबीचे प्रतिनिधीत्व करणारे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आशिया कप आयोजित करायचा आहे

सेठी म्हणाले की, “आम्ही भारताच्या भूमिकेचे समर्थन करत नाही कारण आम्हाला आशिया चषक आयोजित करायचा आहे. सोबतच हेदेखील लक्षात ठेवा की हा केवळ आशिया चषक आणि विश्वचषकाचा प्रश्न नाही. २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचाही मुद्दा आहे”.