मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI vs PCB: टीम इंडिया पाकिस्तानात येणार नसेल तर…, रमीझ राजा यांची BCCI ला धमकी

BCCI vs PCB: टीम इंडिया पाकिस्तानात येणार नसेल तर…, रमीझ राजा यांची BCCI ला धमकी

Nov 26, 2022, 06:27 PM IST

  • Ramiz Raja on asia cup 2023: आशिया चषक २०२३ पाकिस्तानात आयोजित केला जाणार आहे. तर पुढचा एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी एक वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी "टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते.

BCCI vs PCB

Ramiz Raja on asia cup 2023: आशिया चषक २०२३ पाकिस्तानात आयोजित केला जाणार आहे. तर पुढचा एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी एक वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी "टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते.

  • Ramiz Raja on asia cup 2023: आशिया चषक २०२३ पाकिस्तानात आयोजित केला जाणार आहे. तर पुढचा एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी एक वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी "टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर रमीझ राजा यांनी पुन्हा जुन्या वादांना तोंड फोडले आहे. रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा उघडपणे सांगितले की, 'जर भारतीय क्रिकेट संघ २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाकिस्तानात आला नाही, तर पाकिस्तान क्रिकेट संघ देखील २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही". एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलर रमीज राजा यांनी हे वक्तव्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आशिया चषक २०२३ पाकिस्तानात आयोजित केला जाणार आहे. तर पुढचा एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी एक वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी "टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते. तसेच, आशिया चषकाचे तटस्थ ठिकाणी आयोजन करण्यात यावे असेही म्हटले होते. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये चांगलाच वाद पेटला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच, पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनीही यात उडी घेत पाकिस्ताननेदेखील वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात जावू नये असा सल्ला PCB ला दिला होता.

त्याचवेळी, बीसीसीआयकडून एक स्पष्टीकरण देण्यात आले. यात टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही, हे केंद्र सरकारच्या हातात असल्याचे सांगण्यात आले होते.

यानंतर आता रमीझ राजा यांनी, भारत पाकिस्तानला आला नाही तर पाकिस्तान देखील भारतात जाणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा या प्रकरणाला हवा दिली आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानचे संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. परंतु दोघेही एकतर आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात. २०१२ नंतर दोन्ही संघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकताच T20 विश्वचषक २०२२ दरम्यान सामना झाला. ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली.

पुढील बातम्या