मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI vs PCB: 'वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तानला भारतात यावंच लागेल, लिहून घ्या'

BCCI vs PCB: 'वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तानला भारतात यावंच लागेल, लिहून घ्या'

Oct 21, 2022, 12:18 PM IST

    • Aakash Chopra India vs Pakistan: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची धमकी दिली आहे. यावर आकाश चोप्राने कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, "पाकिस्तान संघाला विश्वचषक खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल, हे मी लेखी देऊ शकतो".
India vs Pakistan

Aakash Chopra India vs Pakistan: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची धमकी दिली आहे. यावर आकाश चोप्राने कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, "पाकिस्तान संघाला विश्वचषक खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल, हे मी लेखी देऊ शकतो".

    • Aakash Chopra India vs Pakistan: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची धमकी दिली आहे. यावर आकाश चोप्राने कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, "पाकिस्तान संघाला विश्वचषक खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल, हे मी लेखी देऊ शकतो".

पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्याचवर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. मात्र, या दोन्ही स्पर्धांवरुन जोरदार गदारोळ सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) संतापले आणि म्हटले आहे की जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तर ते पाकिस्तानी संघाला विश्वचषकासाठी भारतात पाठवणार नाहीत. पीसीबीने म्हटले आहे की, आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित केल्यास ते आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मधूनही बाहेर पडतील.

पीसीबीच्या या वक्तव्यानंतर भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू आकाश चोप्राने कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “पाकिस्तान संघाला विश्वचषक खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल आणि आशिया चषकदेखील तटस्थ ठिकाणी आयोजित करावा लागेल, हे मी लेखी देऊ शकतो. कारण आयसीसी आणि एसीसीकडून पाकिस्तानला मोठी रक्कम मिळते, त्यामुळे ते मोठ्या स्पर्धांमधून माघार घेऊ शकत नाहीत, असे आकाश चोप्राचे मत आहे.

पाकिस्तानला पैशांसाठी वर्ल्डकप खेळावाच लागेल

आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी तो म्हणाला, 'भारत एसीसीकडून एक रुपयाही घेत नाही. एसीसीकडून सर्व संघांना जो काही निधी मिळतो, तो भारत घेत नाही. आशियाई क्रिकेटमध्ये भारत आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका बजावत आला आहे.

BCCI ने सांगितले आहे की, आम्ही पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. तसेच, आशिया चषक देखील तटस्थ ठिकाणी आयोजित केला जाईल. हेही तुम्ही माझ्याकडून लेखी घेऊ शकता. सोबतच पाकिस्तानी संघ एकदिवसीय विश्वचषक खेळायला भारतात नक्की येईल, हे देखील मी लिहून देऊ शकतो".

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, 'या सर्व गोष्टी निश्चित आहेत, कारण भारत नसेल तर आशिया कप होऊ शकत नाही. मग तो बंदच करावा लागेल. आशिया चषक हा विश्वचषकापेक्षा खूपच लहान आहे. जर तुम्ही विश्वचषक सोडला तर तुम्हाला आयसीसीकडून मिळणारी मोठी रक्कम विसरावी लागेल".

पुढील बातम्या