मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI President: BCCI मध्ये कोण जास्त ताकदवान? अध्यक्ष की सचिव; कोणाला कोणते अधिकार, जाणून घ्या

BCCI President: BCCI मध्ये कोण जास्त ताकदवान? अध्यक्ष की सचिव; कोणाला कोणते अधिकार, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 19, 2022 06:12 PM IST

BCCI President: बीसीसीआयला नवी टीम मिळाली असून मंगळवारी रॉजर बिन्नी यांना अध्यक्षपदी मान्यता देण्यात आली. यासह सौरव गांगुलीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. तर जय शाह हे पुन्हा एकदा बीसीसीआयचे सचिव असतील.

BCCI President
BCCI President

जगातील सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नवीन बॉस मिळाला आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत माजी क्रिकेटपटू आणि १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग असलेले रॉजर बिन्नी आता बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असतील, असा निर्णय घेण्यात आला. रॉजर बिन्नी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेतील, जो २०१९ पासून या पदावर होता.

ट्रेंडिंग न्यूज

बीसीसीआयच्या या वार्षिक बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये नवीन सदस्यांची निवड करणे हे सर्वात महत्त्वाचे ठरले. बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळाला पण सचिव जय शहा हेच आहेत. जे अलीकडच्या काळात बीसीसीआयचा चेहरा बनले आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सचिव ही बोर्डातील सर्वात शक्तिशाली पदे आहेत, म्हणजेच भारतीय क्रिकेटची सत्ता त्यांच्या हातात आहे.

पण या दोन पदांवर बसलेल्या व्यक्तीचे काम काय, या दोघांपैकी कोण सर्वात शक्तिशाली आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार कोण काय करू शकतो हे जाणून घेऊया.

BCCI अध्यक्षांचे अधिकार आणि भूमिका काय

• बीसीसीआयच्या अध्यक्षांना सर्व बैठकांचे आणि सर्वोच्च परिषदेचे (अॅपेक्स काउंसिल) अध्यक्षपद भुषवावे लागेल.

• BCCI अध्यक्ष BCCI च्या जनरल बॉडीने आणि Apex Council ने दिलेली जबाबदारी पार पाडतील.

• जर मंडळात कोणते पद रिक्त असेल किंवा कोणताही अधिकारी गैरहजर असेल तर त्याची  कामे BCCI अध्यक्ष  करतील.

बीसीसीआय सचिवांचे अधिकार आणि भूमिका

वार्षिक बैठका, विशेष बैठका, सर्वोच्च परिषदेच्या (Apex Council) बैठका आणि इतर सर्व बैठकांची माहिती ठेवणे आणि त्यांचे नियोजन करणे ही कामे सचिव करतात.

• बीसीसीआयच्या वार्षिक अहवाल, आर्थिक अहवालात स्वाक्षरी करण्यात येणाऱ्या तीन व्यक्तींपैकी एक सचिवही असेल.

• बीसीसीआय सचिव सर्व बैठका, रेकॉर्ड, कागदपत्रे आणि जनरल बॉडी, सर्वोच्च परिषदेच्या इतर मालमत्तेसाठी जबाबदार असतील.

• बीसीसीआय अध्यक्षांच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत बीसीसीआयच्या सर्व बैठका आयोजित करण्यासाठी बोर्ड सचिव जबाबदार असतील.

• सर्व सदस्यांना बीसीसीआयची सर्व विधाने, अहवाल पाठवणे. 

• ज्वाईं सचिवाची सर्व कार्ये आणि अधिकार मिळण्याचा अधिकार.

बीसीसीआयमध्ये आता कोण काय झाले?

• अध्यक्ष- रॉजर बिन्नी

• उपाध्यक्ष- राजीव शुक्ला

• - सचिव जय शहा

• सहसचिव- देवजित सैकिया

• खजिनदार- आशिष शेलार

• सर्वोच्च परिषदेसाठी नामनिर्देशित सदस्य- एमकेजे मजुमदार

• IPL गव्हर्निंग कौन्सिलचे नामांकित सदस्य- अरुण सिंग धुमाळ, अभिषेक दालमिया

WhatsApp channel