मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni IPL 2023 : धोनीचा डबल रोल! स्वत:च्याच गोलंदाजीवर ठोकला षटकार, व्हिडीओ पाहाच

MS Dhoni IPL 2023 : धोनीचा डबल रोल! स्वत:च्याच गोलंदाजीवर ठोकला षटकार, व्हिडीओ पाहाच

Mar 25, 2023, 11:20 AM IST

  • MS Dhoni IPL 2023 video : चेन्नई सुपर किंग्जने कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ (csk share MS Dhoni Video) शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. या व्हिडिओमध्ये धोनी स्वत:च्याच गोलंदाजीवर षटकार मारताना दिसत आहे.

MS Dhoni IPL 2023 video

MS Dhoni IPL 2023 video : चेन्नई सुपर किंग्जने कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ (csk share MS Dhoni Video) शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. या व्हिडिओमध्ये धोनी स्वत:च्याच गोलंदाजीवर षटकार मारताना दिसत आहे.

  • MS Dhoni IPL 2023 video : चेन्नई सुपर किंग्जने कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ (csk share MS Dhoni Video) शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. या व्हिडिओमध्ये धोनी स्वत:च्याच गोलंदाजीवर षटकार मारताना दिसत आहे.

MS Dhoni Viral Video : आयपीएल २०२३च्या (IPL 2023) सीझनची उत्सुकता आतापासूनच तमाम क्रिकेटप्रेमींमध्ये दिसू लागली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर ३१ मार्चपासून पुढील २ महिन्यांपर्यंत फक्त आयपीएल पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

दरम्यान, सीएसकेने धोनीचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहून चाहते थोडेसे गोंधळात पडले आहेत.

धोनीच्या या व्हिडिओने चाहते गोंधळात

महेंद्रसिंग धोनी या महिन्याच्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमध्ये सामील झाला होता. तो संघासह नियमित सराव सत्रांमध्ये भाग घेत आहे. या सराव सत्रादरम्यानचाच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत धोनी स्वता: गोलंदाजी करतोय आणि तो स्व:ताच त्या चेंडूवर शॉट देखील खेळताना दिसत आहे.

या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे धोनी एकाच वेळी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करताना दिसत आहे. यादरम्यान धोनी फलंदाजीत अनेक प्रकारचे फटके मारताना दिसला. हा व्हिडिओ शेअर करत CSK ने Mahi's multiverse असे लिहिले आहे.

स्टोक्स-रहाणे चेन्नई संघात

आयपीएल २०२३ सीझनमध्ये इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सही चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. २४ मार्च रोजी बेन स्टोक्स आणि मोईन अली संघात सामील झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील या दोन खेळाडूंशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेही या मोसमात सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे. चेन्नईला आगामी मोसमातील पहिला सामना ३१ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे.