मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mohammed Shami: शामीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; वेश्यांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप

Mohammed Shami: शामीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; वेश्यांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप

May 03, 2023, 05:49 PM IST

  • Hasin Jahan: हसीन जहाँने मोहम्मद शामीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Hasin Jahan And Mohammed Shami

Hasin Jahan: हसीन जहाँने मोहम्मद शामीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

  • Hasin Jahan: हसीन जहाँने मोहम्मद शामीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Supreme Court: मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात हसीन जहाँने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत शामीविरोधचा फौजदारी खटला गेल्या चार वर्षांपासून कोणत्याही निर्णयाशिवाय रखडल्याचे म्हटले गेले आहे. दरम्यान, हसीन जहाँने शामीवर नवे आरोप केले आहेत. मोहम्मद शामी अजूनही भारतीय क्रिकेट संघासोबतच्या परदेश दौऱ्यांवर वेश्यांसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचा तिने म्हटले.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मोहम्मद शामीने हसीन जहाँने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, न्याय मिळवण्यासाठी ती शमीवर सातत्याने खटले दाखल करत आहे. 2018 मध्ये मोहम्मद शामी आणि त्याच्या मोठ्या भावाची कोलकात्याच्या महिला पोलिसांनी चौकशी केली होती. यानंतर अलीपूर कोर्टाने शामीविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. मात्र, वॉरंटला स्थगिती असल्याने कारवाई झाली नाही. नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत कोलकाता न्यायालयाने शामीवरील कारवाईला स्थगिती दिल्याचा आरोप करण्यात आला.हसीन जहाँने नुकत्याच एका याचिकेद्वारे शामीने हुंडा मागितला आणि लग्नानंतर वेश्यांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे.

याचिकेनुसार, वेश्यांशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी शामी एसटीसी कंपनीचा मोबाईल वापरत होता. त्याचा हा फोन कोलकाताच्या लाल बाजार पोलिसांनी जप्त केला. याचिकेत करण्यात आलेल्या आरोपानुसार, शामी अजूनही वेश्यांसमोत शारीरिक संबंध ठेवत असल्याचे म्हटले गेले आहे. या आरोपांवर मोहम्मद शामी म्हणाला होता की, हसीन जहाँने केलेले आरोप खरे ठरले तर मी तिची माफी मागेल. या वर्षाच्या सुरुवातीला कोलकाता कोर्टाने शामीला हसीन जहाँसाठी मासिक ५० हजार रुपये भरपाई देण्यास सांगितले होते.

विभाग