मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PBKS vs MI: शिखर धवन- रोहित शर्मा आमनेसामने, पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामन्याबाबत A टू Z माहिती

PBKS vs MI: शिखर धवन- रोहित शर्मा आमनेसामने, पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामन्याबाबत A टू Z माहिती

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 03, 2023 12:03 PM IST

Punjab Kings vs Mumbai Indians: मुंबई आणि पंजाबच्या संघात आज आयपीएल २०२३ मधील ४६वा सामना खेळला जाणार आहे.

Shikhar Dhawan vs Rohit Sharma
Shikhar Dhawan vs Rohit Sharma

Shikhar Dhawan vs Rohit Sharma: गेल्या सामन्यातील विजयानंतर कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक मुंबई इंडियन्स संघापुढं आज ‘आयपीएल’च्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचे आव्हान असेल. मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत वरच्या स्थानाकडे कूच करण्यासाठी मुंबईला या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबने नऊपैकी पाच सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. त्यामुळे पंजाबचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

कधी, कुठे पाहणार सामना?

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना आज (०३ मे २०२३) संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रवाह 'जिओ सिनेमा' अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. येथे वेगवेगळ्या भाषांमध्ये सामना पाहता येणार आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

पंजाब किंग्ज आणि मुंबई आयपीएलच्या ३० सामन्यांमध्ये एकमेकांशी भिडले आहेत. या ३० सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी १५-१५ सामने समान जिंकले आहेत.

संघ-

पंजाबचा संभाव्य संघ:

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंह.

मुंबईचा संभाव्य संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, पीयुष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ.

WhatsApp channel

विभाग