मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023: चेन्नईविरुद्ध सामन्यापूर्वी लखनौला मोठा धक्का; दुखापतीमुळं स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2023: चेन्नईविरुद्ध सामन्यापूर्वी लखनौला मोठा धक्का; दुखापतीमुळं स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 03, 2023 11:35 AM IST

Jaydev Unadkat Ruled Out: लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे.

LSG Team
LSG Team

Jaydev Unadkat Ruled Out: लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज जयदेव उनाडकट आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर होता. नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. या हंगामात उनादकट फक्त तीन सामने खेळला आहे. यादरम्यान त्याला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, याआधी त्यानं अनेकवेळा चमकदार कामगिरी केली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी उनाडकट दुखापतीवर मात करेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जयदेव उनाडकट गेल्या रविवारी नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत होता. यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. आयपीएलनेही त्याचा व्हिडिओही ट्विट केला होता. पण आता क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, तो या हंगामात खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. दुखापतीमुळे उनाडकट संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होऊ शकतो. उनाडकटला सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले आहे.

उनाडकटने आतापर्यंत ९४ आयपीएलचे सामने खेळले आहेत. यातील ९३ डावात त्याने ८.८५ च्या इकोनॉमी आणि ३१.५ च्या सरासरीने ९१ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने दोन वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

 

 

 

WhatsApp channel

विभाग