मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI VS DC WPL 2023 : दिल्लीचा धमाकेदार विजय, मुंबईचं ११० धावांचे लक्ष्य ९ षटकांत गाठलं

MI VS DC WPL 2023 : दिल्लीचा धमाकेदार विजय, मुंबईचं ११० धावांचे लक्ष्य ९ षटकांत गाठलं

Mar 20, 2023, 10:02 PM IST

    • MI VS DC WPL 2023 Highlights : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला. त्यांनी केवळ ९ षटकांत ११० धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंग, अॅलिस कॅप्सी आणि शेफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही झटपट धावा केल्या.
MI VS DC WPL 2023 Highlights

MI VS DC WPL 2023 Highlights : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला. त्यांनी केवळ ९ षटकांत ११० धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंग, अॅलिस कॅप्सी आणि शेफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही झटपट धावा केल्या.

    • MI VS DC WPL 2023 Highlights : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला. त्यांनी केवळ ९ षटकांत ११० धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंग, अॅलिस कॅप्सी आणि शेफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही झटपट धावा केल्या.

MI VS DC WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला. त्यांनी केवळ ९ षटकांत ११० धावांचे लक्ष्य गाठले. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंग, अॅलिस कॅप्सी आणि शेफाली वर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. तिघींनीही झटपट धावा केल्या. एलिस कॅप्सीने सर्वाधिक नाबाद ३८ धावा केल्या. १७ चेंडूंच्या खेळीत तिने फक्त एक चौकार मारला तर कॅप्सीच्या बॅटमधून ५ षटकार निघाले. कर्णधार मेग लॅनिंग २२ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिली. तिने ४ चौकार मारले.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

शेफाली वर्माने १५ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. लॅनिंग आणि शेफाली यांनीही प्रत्येकी एक षटकार ठोकला. हीली मॅथ्यूजने मुंबईला एकमेव यश मिळवून दिले.

मुंबईचा डाव

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांच्याकडन पूजा वस्त्राकरने सर्वाधिक २६ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर २३, इस्सी वाँग २३ आणि अमनजोत कौर १९ धावा करून बाद झाल्या.

यांशिवाय अमेलिया केरने ८, हीली मॅथ्यूजने ५ आणि यास्तिका भाटियाला एकच धाव करता आली. नतालीला सीव्हर ब्रंट खातेही उघडता आले नाही.

तर दिल्लीसाठी मारिझन कॅपने किलर गोलंदाजी केली. तिने चार षटकांत १३ धावा देत दोन बळी घेतले. शिखा पांडे आणि जेस जोनासेन यांनाही प्रत्येकी दोन विकेट्स मिळाले. अरुंधती रेड्डीने एक विकेट घेतली.