मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI vs GG WPL 2023 : मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये दाखल, गुजरातचा ५५ धावांनी धुव्वा

MI vs GG WPL 2023 : मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये दाखल, गुजरातचा ५५ धावांनी धुव्वा

Mar 14, 2023, 11:11 PM IST

    • MI vs GG Highlights : महिला प्रीमियर लीगचा १२ वा सामना आज (१४ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात जायंट्स (GG) यांच्यात झाला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने ५५ धावांनी विजय मिळवला.
MI vs GG WPL 2023 highlights

MI vs GG Highlights : महिला प्रीमियर लीगचा १२ वा सामना आज (१४ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात जायंट्स (GG) यांच्यात झाला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने ५५ धावांनी विजय मिळवला.

    • MI vs GG Highlights : महिला प्रीमियर लीगचा १२ वा सामना आज (१४ मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात जायंट्स (GG) यांच्यात झाला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने ५५ धावांनी विजय मिळवला.

MUM vs GUJ Women’s Premier League 2023 :  महिला प्रीमियर लीगच्या १२व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा ५५ धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ बाद १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ १०७ धावाच करू शकला.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मुंबई इंडियन्स संघाचा हा सलग पाचवा विजय ठरला. १० गुणांसह हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. याशिवाय या स्पर्धेत आतापर्यंत २०० पेक्षा कमी धावसंख्येचा बचाव करणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे.

दरम्यान, १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ पहिला विकेट पडल्यानंतरच दबावात आला. त्यानंतर शेवटपर्यंत संघ यातून सावरू शकला नाही. गुजरातकडून हरलीन देओलने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर मुंबईकडून नॅट सीव्हर ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

मुंबई इंडियन्सचा डाव -

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांची इनफॉर्म बॅट्समन हेली मॅथ्यूज डावाच्या पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बाद झाली. तिला एशले गार्डनरने बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. यानंतर नॅट सीवर ब्रंट आणि यास्तिका भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. नेट सीव्हरने ३१ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या.

त्यानंतर यास्तिका भाटियाचे अर्धशतक हुकले. ती ३७ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा करुन बाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. अमेलिया १९ धावा करून बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक ठोकले, पण अर्धशतकानंतर तिने तिची विकेट गमावली. हरमनप्रीतला गार्डनरने हरलीन देओलच्या हाती झेलबाद केले.

हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ५१ धावांची धडाकेबाज खेळी केली. तिने आपल्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले. गुजराततर्फे अॅश्ले गार्डनरने ३ बळी घेतले. तर किम गर्थ, स्नेह राणा आणि तनुजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.