मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul Athiya Honeymoon : कुठं कुठं जायचं हनिमूनला... राहुल-अथिया 'अशी' करणार संसाराची सुरुवात!

KL Rahul Athiya Honeymoon : कुठं कुठं जायचं हनिमूनला... राहुल-अथिया 'अशी' करणार संसाराची सुरुवात!

Jan 24, 2023, 11:35 AM IST

    • KL Rahul-Athiya Shetty wedding : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.
KL Rahul Athiya Honeymoon

KL Rahul-Athiya Shetty wedding : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.

    • KL Rahul-Athiya Shetty wedding : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी आज (२३ जानेवारी) खंडाळ्यात सात फेरे घेतले.

भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (२३ जानेवारी) रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये जवळपास १०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नानंतर रिसेप्शनच नाही तर त्यांचे हनीमूनही पुढे ढकलण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल आणि अथियाने त्यांच्या कमिटमेंट्स आणि बिझी शेड्युलमुळे त्यांची हनिमून ट्रिप रद्द केली आहे.

केएल राहुलला फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली असून त्यात राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर केएल राहुलला इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येही खेळायचे आहे. राहुल हा आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाचा कर्णधार आहे. हे आयपीएल मार्चच्या अखेरीपासून ते मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालू शकते. त्यामुळेच पुढील तीन महिने राहुल खूप व्यस्त असणार आहेत.

दुसरीकडे, अथिया शेट्टीने नुकतेच तिचे यूट्यूब चॅनल लॉन्च केले आहे. अशा परिस्थितीत ती या कामात व्यस्त आहे. मात्र, एका मीडिया रिपोर्टनुसार, राहुल आणि अथिया हनीमूनसाठी युरोपला जाणार आहेत. त्याचवेळी, अथियाचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी यांनी लग्नानंतर एक मोठा रिसेप्शनही आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पण हे रिसेप्शन आयपीएलनंतर होणार आहे.