मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah : MI ला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह IPL 2023 मधून बाहेर, वर्ल्ड कप 2023 ही खेळणार नाही

Jasprit Bumrah : MI ला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह IPL 2023 मधून बाहेर, वर्ल्ड कप 2023 ही खेळणार नाही

Aug 04, 2023, 07:08 PM IST

  • Jasprit bumrah rules out of ipl 2023  : जलदगती गोलंदाज व हुकमी एक्का जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आईपीएल २०२३ च्या संपूर्ण सीझनमधून बाहेर गेला आहे.

जसप्रीत बुमराह

Jasprit bumrah rules out of ipl 2023 : जलदगती गोलंदाज व हुकमी एक्का जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आईपीएल २०२३ च्या संपूर्ण सीझनमधून बाहेर गेला आहे.

  • Jasprit bumrah rules out of ipl 2023  : जलदगती गोलंदाज व हुकमी एक्का जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आईपीएल २०२३ च्या संपूर्ण सीझनमधून बाहेर गेला आहे.

Jasprit Bumrah IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ चा सीझन ३१ मार्चपासून सुरू होणार असून यासाठी सर्व संघानी सराव सुरू केला आहे. दरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) संघासाठी वाईट बातमी आहे. जलदगती गोलंदाज व हुकमी एक्का जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आईपीएल २०२३ च्या संपूर्ण सीझनमधून बाहेर गेला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

२९ वर्षीय जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून त्यामुळे त्याला मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापासून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकावे लागले आहे. आता बुमराहच्या पाठीवर सर्जरी करण्यात येणार असल्याने बुमराह यंदाची आयपीएल स्पर्धा खेळणार नाही. 

बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात परतणार होता. परंतु बुमराह मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज नसल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. मात्र त्याहूनही अधिक धक्कादायक बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह आता आयपीएल २०२३ला मुकणार आहे. 

पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह गेल्या सहा सहा महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याची दुखापत आणखीनच वाढत असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे बुमराह आशिया कप, टी 20 वर्ल्डकपनंतर आता आयपीएल २०३ मध्ये देखील खेळणार नाही. आयपीएल त्यानंतर होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीप फायनय आणि एकदिवसीय स्पर्धेत खेळणार का, याबाबतही BCCI नं स्पष्ट केलं आहे.

ऑक्टोबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत बुमराह खेळणार का, यावर बीसीसीआयने म्हटले की, बुमराह बॅक पेनमधून कशाप्रकारे सावरतो यावर सर्व अवलंबून आहे. मात्र त्याची दुखापत बळावत चालल्याने तो अजून सहा महिने तरी क्रिकेट खेळू शकणार नाही.