मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL Awards : धोनीला मागे टाकत रोहित शर्मा IPLचा सर्वोत्कृष्ट कर्णधार, बेस्ट फलंदाज-गोलंदाज कोण? पाहा

IPL Awards : धोनीला मागे टाकत रोहित शर्मा IPLचा सर्वोत्कृष्ट कर्णधार, बेस्ट फलंदाज-गोलंदाज कोण? पाहा

Feb 20, 2023, 01:51 PM IST

    • ipl incredible awards full list : आयपीएलला १५ वर्षे पूर्ण झाली आहे. यामुळे ipl incredible awards या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात बॉल आणि बॅटसोबतच कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ipl incredible पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
IPL Incredible Awards

ipl incredible awards full list : आयपीएलला १५ वर्षे पूर्ण झाली आहे. यामुळे ipl incredible awards या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात बॉल आणि बॅटसोबतच कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ipl incredible पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

    • ipl incredible awards full list : आयपीएलला १५ वर्षे पूर्ण झाली आहे. यामुळे ipl incredible awards या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात बॉल आणि बॅटसोबतच कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ipl incredible पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

IPL Awards: IPL मध्ये १५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (२० फेब्रुवारी) पहिला लिलाव झाला होता. अशा परिस्थितीत, आयपीएलच्या या प्रवासाला १५ वर्षे पूर्ण झाले आहेत. याबद्दल स्टार स्पोर्ट्सने ipl incredible पुरस्कार जाहीर केले आहेत. याममध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट कर्णधारापासून ते सर्वोत्कृष्ट फलंदाजापर्यंत एकूण ६ श्रेणींमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

सर्वोत्कृष्ट कर्णधार : मुंबई इंडियन्सला ५ वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडला गेला आहे. येथे त्याने एमएस धोनी, शेन वॉर्न आणि गौतम गंभीर यांना मागे टाकले. या तिन्ही खेळाडूंनाही या श्रेणीत नामांकन मिळाले होते.

सर्वोत्कृष्ट फलंदाज : हा पुरस्कार एबी डिव्हिलियर्सला मिळाला. या प्रकारात त्याने सुरेश रैना, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले.

सर्वोत्कृष्ट गोलंदाज: जसप्रीत बुमराहला आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत बुमराहसह सुनील नरेन, राशिद खान आणि युझवेंद्र चहल यांचाही समावेश होता.

सर्वोत्कृष्ट प्रभावशाली खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) : आंद्रे रसेल हा आयपीएलच्या १५ वर्षांतला सर्वात प्रभावशाली खेळाडू ठरला आहे. आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने महत्त्वाच्या प्रसंगी त्याने संघाला अनेक वेळा कठीण परिस्थितीत सामने जिंकून दिले आहेत. विंडीजच्या या खेळाडूने शेन वॉटसन, राशिद खान आणि सुनील नरेन यांना या पुरस्कारात मागे टाकले.

एका मोसमातील सर्वोत्तम फलंदाज : विराट कोहलीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विराटने IPL २०१६ मध्ये त्याने ९७३ धावा केल्या होत्या. येथे विराटने ख्रिस गेल (२०११), डेव्हिड वॉर्नर (२०१६) आणि जोस बटलर (२०२२) यांच्या कामगिरीला मागे टाकले.

एका मोसमातील सर्वोत्तम गोलंदाज : विंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन हा पुरस्कार जिंकला आहे. नरेनने IPL २०१२ मध्ये फक्त ५.४७ च्या इकॉनॉमी रेटने २४ विकेट घेतल्या होत्या. नरेनने या पुरस्काराच्या शर्यतीत इतर नामांकित युझवेंद्र चहल (२०२२), जोफ्रा आर्चर (२०२०) आणि रशीद खान (२०१८) यांना मागे टाकले.