मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 ची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, धोनी कॅप्टन तर शुभमन, पाथिरानासह या खेळाडूंचा समावेश, पाहा

IPL 2023 ची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, धोनी कॅप्टन तर शुभमन, पाथिरानासह या खेळाडूंचा समावेश, पाहा

May 31, 2023, 05:19 PM IST

    • ipl 2023 best playing xi : आयपीएल 2023 मध्ये युवा खेळाडूंसोबतच अनुभवी खेळाडूंनीही आपल्या चमकदार कामगिरीने चर्चा मिळवली.
ipl 2023 best playing 11

ipl 2023 best playing xi : आयपीएल 2023 मध्ये युवा खेळाडूंसोबतच अनुभवी खेळाडूंनीही आपल्या चमकदार कामगिरीने चर्चा मिळवली.

    • ipl 2023 best playing xi : आयपीएल 2023 मध्ये युवा खेळाडूंसोबतच अनुभवी खेळाडूंनीही आपल्या चमकदार कामगिरीने चर्चा मिळवली.

IPL 2023 हंगाम संपला आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात ७४ सामने खेळले गेले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने २९ मे (सोमवार) रोजी गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

आयपीएल 2023 मध्ये युवा खेळाडूंसोबतच अनुभवी खेळाडूंनीही आपल्या चमकदार कामगिरीने चर्चा मिळवली. marathi.hindustantimes.com ने आयपीएल 2023 ची एक प्लेइंग-इलेव्हन तयार केली आहे. ही प्लेइंग इलेव्हन या मोसमातील खेळाडूंच्या कामगिरीवर आधारित आहे.

या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीसाठी आम्ही शुभमन गिल आणि फाफ डू प्लेसिसची निवड केली आहे. गिलने या मोसमात गुजरातसाठी ३ शतकांसह ८९० धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली. तर दुसरा सलामीवीर, आरसीबीच्या फाफ डू प्लेसिसने ८ अर्धशतकांच्या मदतीने ७३० धावा केल्या.

सलामीला कोण?

आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीने ओपनिंगची जबाबदारी पार पाडली, पण संघाचा समतोल राखण्यासाठी आम्ही त्याला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. आरसीबीच्या विराटने १४ सामन्यात २ शतकांसह ६३९ धावा केल्या.

मधल्या फळीत कोण?

यानंतर सूर्यकुमार यादव (MI), मार्कस स्टॉइनिस (LSG) आणि रवींद्र जडेजा (CSK) यांचाही या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. सूर्यासाठी हा हंगाम त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आयपीएल हंगाम होता. सूर्यकुमारने १६ सामन्यात एका शतकाच्या जोरावर ६०५ धावा केल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन स्टॉइनिसने या मोसमात ४०८ धावा करत काही सामने स्वबळावर जिंकवले. अंतिम सामन्यातील अष्टपैलू रवींद्र जडेजाची संस्मरणीय कामगिरी सर्वांनीच पाहिली आहे.

आम्ही एमएस धोनीकडे कर्णधारपद आणि यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचे विकेटकीपिंग स्किल्स अजूनही अप्रतिम आहेत.

गोलंदाजांमध्ये कोण-कोण?

वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी, मथिशा पाथिराना आणि मोहित शर्मा यांना स्थान दिले आहे, तर राशीद खानचा लेगस्पिनर म्हणून समावेश केला आहे. गुजरातला अंतिम फेरीत नेण्यात मोहित, शमी आणि राशिद खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वाधिक २८ विकेट्स घेत शमीने पर्पल कॅप मिळवली. डेथ ओव्हर्समधील बॉलिंगमुळे मथिशा पाथिरानाची निवड करण्यात आली आहे. पाथिरानाने आयपीएल 2023 मध्ये एकूण १९ विकेट घेतल्या.

ट्रेन्ट बोल्ट (RR) यशस्वी जैस्वाल (RR), शिवम दुबे (CSK), मोहम्मद सिराज (MI) आणि रिंकू सिंग (KKR) यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवडण्यात आले आहे. प्रथम गोलंदाजी केल्यास, ट्रेन्ट बोल्ट किंवा मोहम्मद सिराजचा वापर कोणत्याही फलंदाजाला प्लेइंग-११ मधून काढून केला जाऊ शकतो. त्याचवेळी फलंदाजीत शिवम दुबे, रिंकू सिंग किंवा यशस्वी जैस्वाल हे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

IPL 2023 ची सर्वोत्तम प्लेइंग-11

शुभमन गिल, फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टॉइनिस, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), रशीद खान, मोहम्मद शमी, मोहित मोहित शर्मा, मथिशा पाथिराना.

इम्पॅक्ट प्लेयर-

यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज, शिवम दुबे, ट्रेन्ट बोल्ट.