मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND VS AUS Womens T20 WC: उंपात्य फेरीत आज भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार, सामन्याची वेळ-ठिकाण माहितीय का?

IND VS AUS Womens T20 WC: उंपात्य फेरीत आज भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार, सामन्याची वेळ-ठिकाण माहितीय का?

Feb 23, 2023, 10:48 AM IST

    • INDW vs AUSW Live Streaming : महिला T20 विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये होणार आहे.
INDW vs AUS Women 1st Semifinals

INDW vs AUSW Live Streaming : महिला T20 विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये होणार आहे.

    • INDW vs AUSW Live Streaming : महिला T20 विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये होणार आहे.

INDW vs AUS Women 1st Semifinals Live Update : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला-टी-20 वर्ल्डकपचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज (२३ फेब्रुवारी) या स्पर्धेतील पहिला सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये होणार आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाची नजर फायनलमध्ये प्रवेश करण्यावर असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

भारतीय संघाने यापूर्वी २०२० च्या टी-20 विश्वचषकाची फायनल गाठली होती. पण त्यावेळी जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आजचा उपांत्य फेरीचा सामना चांगलाच अतितटीचा होणार आहे.

विश्वचषकात दोन्ही संघांची शानदार कामगिरी

महिला T20 विश्वचषक २०२३ मध्ये दोन्ही संघांची कामगिरी चांगली झाली आहे. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत ४ पैकी ३ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने सर्व सामने जिंकून सेमी फायनल गाठली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामना कुठे होईल?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यीतील सेमी फायनलचा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर होणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सेमी फायनल किती वाजता सुरू होईल?

महिला टी-20 वर्ल्डकपमधील भारत-ऑस्ट्रेलिया सेमी फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच ६ वाजता होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया सेमी फायनल कोणत्या चॅनेलवर दिसणार?

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवरही होणार आहे.

दुसरीकडे, ज्यांच्याकडे हॉटस्टार सबस्क्रिप्शन आहे ते लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे त्यांच्या मोबाइल फोनवर सामन्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय https://marathi.hindustantimes.com/ वर सामन्याचे क्षणोक्षणी अपडेट्स उपलब्ध असतील.