मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup 2022 : भारताचा ‘हा’ खेळाडू T20 विश्वचषकात ठरणार मॅच विनर; लिटल मास्टरांचं मोठं भाकित

T20 World Cup 2022 : भारताचा ‘हा’ खेळाडू T20 विश्वचषकात ठरणार मॅच विनर; लिटल मास्टरांचं मोठं भाकित

Sep 15, 2022, 03:27 PM IST

    • T20 World Cup 2022 : बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वीच T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
sunil gavaskar (HT)

T20 World Cup 2022 : बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वीच T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

    • T20 World Cup 2022 : बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वीच T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

T20 World Cup 2022 Schedule : T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून बीसीसीआयनं १५ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होणार असून आता भारतीय संघाची या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी T20 वर्ल्डकपबाबत एक मोठं भाकित केलं आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताचा कोणता खेळाडू मैदान गाजवू शकतो, याबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

एका मुलाखतीत बोलताना सुनिल गावस्कर म्हणाले की, १९८५ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ज्या प्रमाणे रवि शास्त्री यांनी गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली होती, त्याचप्रमाणे आता या T20 वर्ल्डकपध्ये भारताचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या प्रदर्शन करेल, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. हार्दिक बॅट आणि बॉलनं उत्तम कामगिरी करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो, याशिवाय अखेरच्या काही षटकांत स्फोटक फलंदाजी करण्याचीही क्षमता असल्यानं तो कोणताही सामना एकहाती फिरवू शकतो, असं गावस्कर म्हणाले.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्याला मैदानावर गोलंदाजी करताना पाठित दुखापत झाली होती. त्यानंतर त्यानं त्यावर मात करत आशिया कपमध्ये जबरदस्त पुनरागमन केलं होतं. त्यानंतर आता तो T20 वर्ल्डकपध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. याशिवाय बीसीसीआयनं जाहीर केलेल्या संघात ऑलराऊंडर रविंद्र जडेजाला स्थान देण्यात आलेलं नाही. कारण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी सराव करताना जडेजाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुलं त्याची T20 वर्ल्डकपध्ये निवड करण्यात आलेली नाही.