मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asad Rauf : बीसीसीआयच्या बंदीनंतर चपला विकण्याची वेळ आलेले माजी पंच असद रौफ यांचं निधन
Asad Rauf Passed Away Pakistan
Asad Rauf Passed Away Pakistan (HT)

Asad Rauf : बीसीसीआयच्या बंदीनंतर चपला विकण्याची वेळ आलेले माजी पंच असद रौफ यांचं निधन

15 September 2022, 10:18 ISTAtik Sikandar Shaikh

Asad Rauf Passed Away : पाकिस्तानचे माजी अंपायर असद रऊफ यांचं हार्ट अटॅकमुळं झालं आहे. त्यांनी आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केलं होतं.

Asad Rauf Passed Away Pakistan : प्रसिद्ध पाकिस्तानी पंच असद रऊफ (६६) यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. अनेक खेळाडूंनी रऊफ यांच्या निधनामुळं शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण २०० पेक्षा जास्त सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिलं होतं. याशिवाय ते आयपीएलच्या सामन्यांतही अंपायर राहिलेले होते. त्यामुळं आता त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात शोक व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रऊफ हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यांना लाहोरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळं त्यांचं निधन झालं आहे. क्रिकेटमध्ये अंपायरींगच्या क्षेत्रात असद रऊफ यांचं मोठं नाव होतं. त्यांनी अलीम दार यांच्यासोबतही अनेकदा पंच म्हणून काम पाहिलं. त्यामुळं फार कमी वेळात या दोन्ही पंचांनी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा दबदबा निर्माण केला होता. परंतु जेव्हा २०१३ मध्ये आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्यांचं नाव आलं आणि त्यांच्या करियरला मोठा ब्रेक लागला.

सट्टेबाजांशी संबंध असल्याच्या आरोपांमुळं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) असद रऊफ यांच्यावर बंदी घातली होती. याशिवाय बीसीसीआयच्या आरोपानंतर आयसीसीनंही रऊफ यांना एलिट पॅनलमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता.

कमाईचा स्त्रोत बंद झाल्यानं त्यानंतर असद रऊफ यांना उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वीच त्यांनी पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये चपला आणि कपड्यांचं दुकान उघडलं होतं. त्यामुळं आता त्यांचं अचानक निधन झाल्यानंतर क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.