मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पुन्हा रोहित, विराटला वगळलं!

IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पुन्हा रोहित, विराटला वगळलं!

Jan 25, 2023, 03:31 PM IST

  • IND vs NZ T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या २७ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Team India

IND vs NZ T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या २७ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

  • IND vs NZ T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या २७ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

India vs New Zealand T20I Matches Squads: भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आता हार्दिक पांड्याचे शिलेदार टी-२० मालिकेत तिरंगा फडकावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या २७ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. तर, युवा खेळाडूंना स्वतःचा दर्जा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा भाग असलेल्या अनेक खेळाडूंना टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संघातून वगळण्यात आले नसून त्यांना विश्रांती देण्यात आल्याचे संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली. रजत पाटीदार, शाहबाज अहमद आणि केएस टी-२० मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतील. तर, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद शामीला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

भारताचा युवा आणि प्रभावशाली फलंदाज पृथ्वी शॉ दिर्घ काळानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. केएल राहुलऐवजी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. पण भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला जागा मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्याची सलामीवीर ऋतुराज गायकवाडशी स्पर्धा असेल. राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, शिवम मावी, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि जितेश शर्मा यांचाही टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), सुर्यकुमार यादव (उपकर्णधार),ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र जहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ:

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिप्ले , ईश सोढी, आणि ब्लेअर टिकनर.