मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill: शतक झळकावूनही शुभमन गिलचे वडील नाराज; द्रविडने घेतलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी उघड
Shubman Gill and Rahul Dravid
Shubman Gill and Rahul Dravid

Shubman Gill: शतक झळकावूनही शुभमन गिलचे वडील नाराज; द्रविडने घेतलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी उघड

25 January 2023, 12:35 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Shubman Gill Interview: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुभमन गिलची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शुभमन गिलने त्याच्या वडिलांबाबत भाष्य केले.

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ९० धावांनी विजय मिळवत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने ११२ धावांची शानदार खेळी केली. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत 212 धावांची सलामी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. गिलचे गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमधील हे तिसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 208 धावांची खेळी केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यानंतर भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुभमन गिलची मुलाखत घेतली. यादरम्यान द्रविडने गिलला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममागचे कारण त्याचे वडील आहेत. राहुल द्रविड यांनी घेतलेल्या मुलाखतीत शुमभन गिल म्हणाला की, "मला वाटत नाही माझे शतक पाहून माझे वडील खूश झाले असतील. मी शतक झळकावल्यानंतर चांगली फलंदाजी करावी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील माझे दुसरे द्विशतक झळकावण्याचा प्रयत्न करावा, अशी त्यांची इच्छा आहे."

|#+|

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून तू खूप लयीत आहेस. गेल्या सहा डावांत तीन शतके झळकावली आहेत. तुला आता कसे वाटते आहे असे राहुल द्रविडने गिलला विचारले असता तो म्हणाला की, त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी आवडते. तो सुरुवातीला वेळ काढून खेळपट्टी कशी आहे ते पाहतो. त्यानंतर तो आपला नैसर्गिक खेळ दाखवायला सुरुवात करतो. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी तो खेळेल की नाही हे माहित नव्हते. पण कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासावर तो खरा उतरला.

विभाग