मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ball of the series : कुलदीप यादवचा तो चेंडू ठरला 'बॉल ऑफ द सीरीज'; तुम्ही पाहिला का?

Ball of the series : कुलदीप यादवचा तो चेंडू ठरला 'बॉल ऑफ द सीरीज'; तुम्ही पाहिला का?

Mar 23, 2023, 01:06 PM IST

  • Kuldeep Yadav in India vs Australia ODI :  भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेतील शेवटचा सामना कुलदीप यादवच्या फिरकीनं गाजवला.

Kuldeep Yadav

Kuldeep Yadav in India vs Australia ODI : भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेतील शेवटचा सामना कुलदीप यादवच्या फिरकीनं गाजवला.

  • Kuldeep Yadav in India vs Australia ODI :  भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेतील शेवटचा सामना कुलदीप यादवच्या फिरकीनं गाजवला.

Ball of the series : कसोटी मालिकेत भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारली असली तरी एकदिवसीय मालिका खिशात घालून ऑस्ट्रेलियानं हिशेब बरोबर केला. पहिल्या दोन सामन्यांपर्यंत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केली होती. मात्र, निर्णायक सामन्यात भारतीय संघाच्या चुका ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडल्या. भारताचा पराभव झाला असला तरी फिरकीपटू कुलदीप यादवच्या फिरकीनं पाहुण्यांना चक्रावून सोडलं होतं. कुलदीपनं टाकलेला एक चेंडू चक्क 'बॉल ऑफ द सीरीज' ठरला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

'चायनामन' अशी ओळख असलेल्या कुलदीप यादवनं या सामन्यात १० षटकात ५६ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. कुलदीपनं डेव्हिड वॉर्नर, मार्नस लबुशेन आणि अॅलेक्स कॅरीसारख्या दिग्गज खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीपनं अॅलेक्स कॅरीला टाकलेला एक चेंडू फलंदाजासह खुद्द कुलदीपलाही हैराण करणारा ठरला. हा चेंडू अॅलेक्स कॅरीला समजलाच नाही. कुलदीपनं टाकलेला तो चेंडू जमिनीवर पडल्यानंतर असा काही वळला की त्यानं कॅरीला हलण्याची संधीच दिली नाही. हा चेंडू कॅरीच्या बॅटला चकवा देत थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. हा चेंडू 'बॉल ऑफ द सिरीज' ठरला.

व्हिडिओमध्ये पाहा कुलदीप यादवचा तो जादुई चेंडू

बांगलादेश दौऱ्यावर परतलो!

बांगलादेश दौऱ्यासाठी संधी मिळालेल्या कुलदीप यादवनं भारतीय संघात शानदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या सामन्यात त्यानं एकूण ८ विकेट घेतल्या होत्या. असं असतानाही त्याला दुसऱ्या कसोटीत संधी देण्यात आली नाही. कुलदीप अजूनही संघात स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तब्बल वर्षभरानंतर संधी मिळालेल्या कुलदीपनं सध्या आपल्या गोलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विभाग