मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ T20 : खळखळून हसायचंय? मग हे मीम्स बघाच! विराट-रोहितच्या चाहत्यांनी उडवली हार्दिकची खिल्ली

IND vs NZ T20 : खळखळून हसायचंय? मग हे मीम्स बघाच! विराट-रोहितच्या चाहत्यांनी उडवली हार्दिकची खिल्ली

Jan 28, 2023, 12:17 PM IST

    • IND vs NZ t20, funny memes on hardik pandya: तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा २१ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ रोहित आणि विराटच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला.
funny memes on hardik pandya

IND vs NZ t20, funny memes on hardik pandya: तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा २१ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ रोहित आणि विराटच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला.

    • IND vs NZ t20, funny memes on hardik pandya: तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा २१ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ रोहित आणि विराटच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला.

in vs nz 1st t20 match Ranchi funny Memes : पहिल्या T20 मध्ये न्यूझीलंडने भारताचा २१ धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ २० षटकात ९ बाद १५५ धावाच करू शकला.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हार्दिक आणि संघाची खूप खिल्ली उडवली आहे. चाहत्यांनी विराट आणि रोहितचे फोटो वापरून हार्दिकची खिल्ली उडवली आहे.

सोबतच अर्शदीप सिंगदेखील चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. हार्दिक आणि अर्शदीप सिंग यांच्यावर अनेक मजेशीर मीम्स पोस्ट करण्यात आले आहेत. या सामन्यात अर्शदीपने शेवटच्या षटकात २७ धावा दिल्या होत्या, जे पराभवाचे मुख्य कारण ठरले. तर वॉशिंग्टन सुंदरच्या अष्टपैलू कामगिरीचे चाहत्यांनीही मीम्सद्वारे कौतुक केले आहे. टॉप मीम्स पहा...

सामन्यात काय घडलं?

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यांच्याकडून डेव्हन कॉनवेने ५२ आणि डॅरिल मिशेलने नाबाद ५९ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात भारताचा संघ २० षटकात ९ बाद १५५ धावाच करू शकला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याने २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने ४७ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून ब्रेसवेल, फर्ग्युसन आणि सँटनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच, जेकब डफी आणि इश सोढी यांना एक विकेट मिळाली.या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.