मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: रोहितच्या सिक्समुळे चिमुरडी जखमी, इंग्लंडच्या फिजीओनं मनं जिंकली

Rohit Sharma: रोहितच्या सिक्समुळे चिमुरडी जखमी, इंग्लंडच्या फिजीओनं मनं जिंकली

Jul 12, 2022, 09:24 PM IST

    • इंग्लंडने दिलेल्या ११० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल शॉट मारला, यामुळे मैदानावरील एक लहान मुलगी जखमी झाली. या घटनेमुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता.
Rohit Sharma

इंग्लंडने दिलेल्या ११० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल शॉट मारला, यामुळे मैदानावरील एक लहान मुलगी जखमी झाली. या घटनेमुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता.

    • इंग्लंडने दिलेल्या ११० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल शॉट मारला, यामुळे मैदानावरील एक लहान मुलगी जखमी झाली. या घटनेमुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता.

भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला आज (१२ जुलै) पासून सुरुवात झाली आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना भारताच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ २५.२ षटकातच ११० धावांवर गारद झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

भारताकडून बुमराहने सर्वाधिक ६ तर शमीने ३ विकेट्स घेतले. तर इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार ठोकले.

दरम्यान, इंग्लंडने दिलेल्या ११० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दमदार झाली. मात्र, यावेळी भयानक घटना घडली. 

रोहित शर्मा स्ट्राईकवर असताना डेव्हिड विलीने त्याच्या ओव्हरमधील तिसरा चेंडू शॉट पिच टाकला. या बॉलवर रोहितने पुल शॉट मारला, तो थेट प्रेक्षकांमध्ये गेला. कॅमेरामन चेंडूचा पाठलाग करत सीमारेषेपर्यंत पोहोचला, तोच त्यादरम्यान चेंडू एका लहान मुलीला लागल्याचे दिसले. 

रडणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांनी तिला लगेच उचलून शांत करण्यास सुरुवात केली. यानंतर रोहित आणि इंग्लंडचे खेळाडू त्या मुलीकडे बघत राहिले. मात्र, त्यानंतर इंग्लंडचे फिजिओ तातडीने त्या जखमी मुलीकडे धावताना दिसले. या घटनेनंतर काही काळ सामना थांबवण्यात आला होता, ही घटना ५ व्या षटकात घडली.