मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : आयपीएल होणार अधिक रंगतदार, अनेक नियमांमध्ये बदल

IPL 2023 : आयपीएल होणार अधिक रंगतदार, अनेक नियमांमध्ये बदल

Mar 24, 2023, 09:40 PM IST

  • IPL 2023 New Rules and Changes : आयपीएल क्रिकेट स्पर्धा अधिकाधिक रंगतदार करण्यासाठी बीसीसीआयनं स्पर्धेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत तर काही नवीन नियम आणले आहेत.

IPL 2023

IPL 2023 New Rules and Changes : आयपीएल क्रिकेट स्पर्धा अधिकाधिक रंगतदार करण्यासाठी बीसीसीआयनं स्पर्धेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत तर काही नवीन नियम आणले आहेत.

  • IPL 2023 New Rules and Changes : आयपीएल क्रिकेट स्पर्धा अधिकाधिक रंगतदार करण्यासाठी बीसीसीआयनं स्पर्धेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत तर काही नवीन नियम आणले आहेत.

IPL 2023 New Rules and Changes : आयपीएल २०२३ चा धडाका सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना या स्पर्धेच्या नव्या नियमांची चर्चा सुरू आहे. येत्या ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या १६ व्या सीझनमध्ये अनेक बदल दिसणार आहेत. स्पर्धेचे काही नियम बदलण्यात आले असून काही नवे नियमही आणले गेले आहेत. त्यामुळं आयपीएल अधिकच रंगतदार होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

काय आहेत नवे नियम आणि कायदे?

इम्पॅक्ट प्लेयर : बीसीसीआयनं आयपीएल २०२३ मध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू केला आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हा नियम वापरला जाणार आहे. यामध्ये संघाला ११ ऐवजी १२ खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. जेव्हा संघाला एखाद्या प्रभावी खेळाडूची गरज लागेल, तेव्हा पंच मैदानावर 'हँड क्रॉस' करून इशारा करतील.

नाणेफेकीनंतर प्लेइंग इलेव्हनची निवड : दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या अंतिम संघाच्या दोन याद्या घेऊन नाणेफेकसाठी येतील. नाणेफेक जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर कोणता दोन पैकी कोणता संघ निवडायचा याचा निर्णय कर्णधाराला तिथंच घ्यावा लागेल. त्यानुसार ते एक यादी व्यवस्थापनाकडं सोपवतील, तीच टीम सामन्यासाठी मैदानात उतरेल. आतापर्यंत कर्णधारांना सामन्याआधी अंतिम संघाची यादी सामना अधिकाऱ्यांना द्यावी लागत असे.

DRS : प्रत्येक सामन्यातील प्रत्येक डावासाठी संघांना दोन DRS मिळतील. एलबीडब्ल्यू आणि यष्टीमागील कॅच व्यतिरिक्त वाईड आणि नो बॉलसाठी देखील डीआरएसचा वापर करता येईल.

स्ट्राइक : एखादा खेळाडू झेलबाद झाल्यावर येणारा फलंदाज थेट स्ट्राइक येईल, मग त्यावेळी स्ट्राइक बदललेला असो किंवा नसो. केवळ षटकाचा अखेरचा चेंडू यास अपवाद असेल.

कोविड १९: कोरोनामुळं एखादा संघ त्यांची प्लेइंग इलेव्हन पूर्ण करू शकला नाही, तर सामन्याची वेळ बदलण्यात येईल. एखादा खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कोविड १९ पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना ७ दिवस विलगीकरणात राहावं लागेल. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना पुन्हा संघात सहभागी करून घेतले जाईल.

ओवर रेट पॅनल्टी: निर्धारित वेळेत डाव पूर्ण झाला नाही किंवा शेवटचं षटक वेळेत सुरू केलं नाही तर प्रत्येक षटकासाठी ३० यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक ठेवण्याची शिक्षा संबंधित संघास होईल.

यष्टीरक्षकाचं गैरवर्तन : यष्टीरक्षकानं यष्टीमागे काही चुकीच्या हालचाली किंवा फलंदाजास संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित बॉल डेड बॉल घोषित केला जाईल आणि विरोधी संघाला ५ धावा देण्यात येतील.

विभाग