मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hardik Pandya video: प्रायव्हेट जेट, फॅमिली अन् प्रॅक्टिस! अशी सुरुय हार्दिक पांड्याची लाईफ

Hardik Pandya video: प्रायव्हेट जेट, फॅमिली अन् प्रॅक्टिस! अशी सुरुय हार्दिक पांड्याची लाईफ

Aug 24, 2022, 05:30 PM IST

    • हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंतची त्याची संपूर्ण दिनचर्या दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून असे दिसते की, हार्दिक त्याच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवत आहे.
Hardik Pandya

हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंतची त्याची संपूर्ण दिनचर्या दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून असे दिसते की, हार्दिक त्याच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवत आहे.

    • हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंतची त्याची संपूर्ण दिनचर्या दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून असे दिसते की, हार्दिक त्याच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवत आहे.

आशिया चषकात भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार असून या सामन्याला आता फारसा वेळ उरलेला नाही. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी सर्व संघ यूएईला पोहोचले आहेत. सर्व संघांनी तयारी देखील सुरू केली आहे. भारतीय संघही दुबईला पोहोचला असून सर्व खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

अशातच हार्दिक पांड्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने त्याचे आयुष्य कसे चालले आहे आणि तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कशी तयारी करत आहे, याची माहिती दाखवली आहे.

हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंतची त्याची संपूर्ण दिनचर्या दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून असे दिसते की, हार्दिक त्याच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत हार्दिक दिवसभर काय करतो हे दाखवून दिले आहे. हार्दिक या व्हिडिओमध्ये त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यादरम्यान तो बेस्ट लूकमध्ये दिसत आहे. याशिवाय तो आपल्या आई आणि पत्नीला भेटतो आणि नंतर तो आपला पुतण्याला झोपवतानाही दिसत आहे. यानंतर शेवटी मैदानात पोहोचून क्रिकेट प्रॅक्टिस करताना दिसून येत आहे

हार्दिकचे टी-२० करिअर-

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आयपीएलपासून जबरदस्त लयीत आहे. आशिया चषक स्पर्धेत त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

पंड्याने आतापर्यंत ६७ टी-20 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान त्याने ४८ डावांमध्ये २३.२ च्या सरासरीने ८३४ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने २७.८ च्या सरासरीने ५८ डावांमध्ये ५० विकेट्स घेतल्या आहेत.

आशिया चषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, केएल राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, युजवेंद्र चहल.