मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीवर FIFA ची खास सीरीज, शुटिंगला सुरुवात

भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीवर FIFA ची खास सीरीज, शुटिंगला सुरुवात

Jun 19, 2022, 05:04 PM IST

    • सुनील छेत्रीसाठी ही एक मोठी उपलब्धी असणार आहे.
sunil chhetri

सुनील छेत्रीसाठी ही एक मोठी उपलब्धी असणार आहे.

    • सुनील छेत्रीसाठी ही एक मोठी उपलब्धी असणार आहे.

जगात जेव्हा भारतीय फुटबॉलचा उल्लेख होतो, तेव्हा फक्त दोनच नावे समोर येतात. ते म्हणजे भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया आणि विद्यमान कर्णधार सुनील छेत्री. सध्या फिफा छेत्रीवर एका खास सीरीजचे शूटिंग करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची आतापर्यंतची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. याची दखल फिफानेही घेतली आहे. म्हणूनच फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (FIFA) त्याच्या या शानदार कारकिर्दीवर विशेष सीरीज बनवत आहे. सुनील छेत्रीसाठी ही एक मोठी उपलब्धी असणार आहे.

या संबंधित माहिती असणाऱ्या एका सूत्राने सांगितले आहे की, “वेबसीरीजचा काही भाग हा बंगळुरूमध्ये शूट केला जात आहे. तर काही भाग ही दिल्लीत शूट केला जात आहे, जिथे त्याचे पालक राहतात. सुनील छेत्री दिल्लीतच लहानाचा मोठा झाला आहे, मात्र, तो बंगळुरुत राहतो".

तसेच, सुत्राने पुढे सांगितले की, “ही खास सीरीज फिफाच्या प्रादेशिक कंटेंट उपक्रमाचा एक भाग आहे. जो फिफाने नुकताच लॉन्च केला आहे".

दरम्यान, सुनिल छेत्रीने नुकतेच हंगेरियन महान फुटबॉलपटू फेरेंक पुस्कासच्या ८४ आंतरराष्ट्रीय गोलची बरोबरी केली. त्यामुळे इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लब टोटेनहॅम हॉटस्परने काही दिवसांपूर्वीच सुनिल छेत्रीला अभिनंदनाचा खास संदेश पाठवला होता.