मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ENG vs NZ : इंग्लंडनं टी-20 स्टाईलमध्ये जिंकली पहिली कसोटी, पिंक बॉल टेस्टमध्ये न्यूझीलंडला चिरडलं

ENG vs NZ : इंग्लंडनं टी-20 स्टाईलमध्ये जिंकली पहिली कसोटी, पिंक बॉल टेस्टमध्ये न्यूझीलंडला चिरडलं

Feb 19, 2023, 11:21 AM IST

    • New Zealand vs England test match highlights : इंग्लंडने चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. या दिवस-रात्र कसोटी सामन्यात न्यूझीलंडसमोर ३९४ धावांचे कठीण लक्ष्य होते, प्रत्युत्तरात यजमान संघ केवळ १२६ धावांवरच गारद झाला.
New Zealand vs England test match

New Zealand vs England test match highlights : इंग्लंडने चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. या दिवस-रात्र कसोटी सामन्यात न्यूझीलंडसमोर ३९४ धावांचे कठीण लक्ष्य होते, प्रत्युत्तरात यजमान संघ केवळ १२६ धावांवरच गारद झाला.

    • New Zealand vs England test match highlights : इंग्लंडने चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. या दिवस-रात्र कसोटी सामन्यात न्यूझीलंडसमोर ३९४ धावांचे कठीण लक्ष्य होते, प्रत्युत्तरात यजमान संघ केवळ १२६ धावांवरच गारद झाला.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळला गेला. हा सामना इंग्लंडने २६७ धावांनी जिंकला. यासह इंग्लंडला किवी भूमीवर १५ वर्षांनंतर पहिला कसोटी विजय नोंदवण्यात यश आले.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

इंग्लंडने चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. या दिवस-रात्र कसोटी सामन्यात न्यूझीलंडसमोर ३९४ धावांचे कठीण लक्ष्य होते, प्रत्युत्तरात यजमान संघ केवळ १२६ धावांवरच गारद झाला. 

इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या जोडीने मिळून किवीजचे वाईट हाल केले. दोन्ही अनुभवी वेगवान गोलंदाजांनी ४-४ विकेट घेतल्या. ओली रॉबिन्सन आणि जॅक लीच यांना १-१ विकेट मिळाला. आता मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी २४ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळवली जाणार आहे.

ब्रॉड-अँडरसनचा विश्वविक्रम 

स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी मिळून एक मोठा विक्रम केला आहे. या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये एकत्र १००० कसोटी बळी पूर्ण केले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ही दुसरी जोडी आहे, याआधी ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा यांनी अशी कामगिरी केली होती. 

न्यूझीलंडच्या फलंदाजांची दुसऱ्या डावात खराब कामगिरी

दरम्यान, इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ६३ अशी होती. त्यानंतर चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा संघ केवळ ५७ धावा जोडू शकला आणि १२६ गारद झाला. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सने सर्वाधिक नाबाद ५७ धावांची खेळी खेळली. याशिवाय सलामीवीर टॉम लॅथम आणि मायकेल ब्रेसवेल वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

इंग्लंडने पहिल्याच दिवशी डाव घोषित केला होता

तत्पूर्वी, इंग्लंडने दुसऱ्या डावात ३७४ धावा केल्या. त्यांच्याकडून जो रूट (५७), हॅरी ब्रूक (५४) आणि बेन फोक्स (५१) यांनी झटपट अर्धशतकी खेळी खेळली. पहिल्या डावात इंग्लिश संघाने कमाल केली होती. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच दिवशी त्यांनी ५९ षटकांत झटपट ३२५ धावा केल्या आणि डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी संघाने डाव घोषित करण्याची ही केवळ तिसरी वेळ होती. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही चांगला पलटवार केला आणि पहिल्या डावात ३०६ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला केवळ १९ धावांची आघाडी मिळवता आली.