मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs ENG: ‘वॉशरूमपर्यंत पाठलाग होतो…,’ सुरक्षा व्यवस्थेमुळं इंग्लंडचा 'हा' फलंदाज त्रस्त

PAK vs ENG: ‘वॉशरूमपर्यंत पाठलाग होतो…,’ सुरक्षा व्यवस्थेमुळं इंग्लंडचा 'हा' फलंदाज त्रस्त

Sep 23, 2022, 04:17 PM IST

    • Harry Brook on Security System In Pakistan: इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. तेव्हापासून कोणत्याही देशाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. यामुळे पाकिस्तानात पाहुण्या संघाला कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. मात्र, इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याने अति सुरक्षा व्यवस्थेमुळे त्रस्त झाल्याचे सांगितले आहे. 
PAK vs ENG:

Harry Brook on Security System In Pakistan: इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. तेव्हापासून कोणत्याही देशाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. यामुळे पाकिस्तानात पाहुण्या संघाला कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. मात्र, इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याने अति सुरक्षा व्यवस्थेमुळे त्रस्त झाल्याचे सांगितले आहे.

    • Harry Brook on Security System In Pakistan: इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. तेव्हापासून कोणत्याही देशाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. यामुळे पाकिस्तानात पाहुण्या संघाला कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. मात्र, इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याने अति सुरक्षा व्यवस्थेमुळे त्रस्त झाल्याचे सांगितले आहे. 

इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. सात टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी संघ तेथे गेला आहे. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. तेव्हापासून कोणत्याही देशाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. मात्र, आता परिस्थिती सुधारली असून गेल्या काही काळापासून मोठमोठे संघ पाकिस्तानचा दौरा करत आहेत. पाकिस्ताननेही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली आहे. मात्र, काही वेळा अतिसुरक्षा व्यवस्थेमुळे खेळाडू अस्वस्थ होताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याने अति सुरक्षा व्यवस्थेमुळे त्रस्त झाल्याचे सांगितले आहे. हॅरी ब्रूक गंमतीने म्हणाला की, “ मी वॉशरूममध्ये जातो तेव्हाही कोणीतरी माझ्या मागे येतं. मी याआधी असे कधीही अनुभवले नव्हते, पण छान आहे, आम्हाला इथे खूप सुरक्षित वाटते. आम्ही सर्वजण पाकिस्तान दौऱ्याचा आणि या कडक सुरक्षेचा आनंद घेत आहोत".

मोठ्या संघांचे सातत्याने आगमन होत असल्याने पाकिस्तानमधील क्रिकेटची स्थिती सुधारत आहे. पाकिस्तानला मोठ्या स्पर्धांचे यजमानपदही मिळत आहे. पुढील वर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. याशिवाय २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजनही करायचे आहे.

७ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा १० विकेट्सनी पराभव केला. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरी आहेत.