मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Pak Cricket: ऑक्टोबरमध्ये दोनदा भिडणार भारत आणि पाकिस्तान, जाणून घ्या कसं?

Ind vs Pak Cricket: ऑक्टोबरमध्ये दोनदा भिडणार भारत आणि पाकिस्तान, जाणून घ्या कसं?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2022 05:08 PM IST

India Vs Pakistan Match Twice In October: ऑक्टोबर महिन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ दोनदा एकमेकांना भिडणार आहेत. ऑक्टोबर महिन्यातील भारत-पाक पहिला सामना महिलांच्या आशिया चषकात होणार आहे. तर दुसरा सामना पुरुषांच्या T20 वर्ल्डकपमध्ये होणार आहे.

Ind vs Pak
Ind vs Pak

आशिया चषक २०२२ मध्ये भारता आणि पाकिस्तानचे संघ दोनदा आमने सामने आले होते. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्यात दोन्ही संघ दोनदा आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचे संघ ऑक्टोबरमध्ये महिला आशिया चषक आणि पुरुषांच्या T20 विश्वचषकात भिडताना दिसणार आहेत.

७ ऑक्टोबरला आशिया चषकात भारत-पाकिस्तान भिडणार

महिलांची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेशमध्ये १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि बांगलादेशचे संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचे संघ ७ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. भारत राऊंड रॉबिन प्रकारात एकूण ६ सामने खेळणार आहे. यानंतर उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. 

आशिया कपसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एस मेघना, रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, केपी नवगिरे.

स्टँडबाय खेळाडू: तान्या भाटिया, सिमरन दिल बहादूर.

२३ ऑक्टोबरला T20 विश्वचषकात भारत पाकिस्तान लढत

१६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तर भारतीय संघ २३ ऑक्टोबर आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्धखेळणार आहे. T20 विश्वचषकात दोन्ही संघ वर्षभरानंतर आमनेसामने येणार आहेत. गेल्या वर्षी दुबईत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 

 रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन , युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, दीपक चहर, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.

WhatsApp channel