मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ENG vs IND : IPL मधील कामगिरीचं बक्षीस, अर्शदीप सिंगचे आंतरराष्ट्रीय पदार्पण

ENG vs IND : IPL मधील कामगिरीचं बक्षीस, अर्शदीप सिंगचे आंतरराष्ट्रीय पदार्पण

Jul 07, 2022, 10:42 PM IST

    • भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. युवा गोलंदाज अर्शदीप सिंग आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत आहे.
arshdeep singh

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. युवा गोलंदाज अर्शदीप सिंग आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत आहे.

    • भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. युवा गोलंदाज अर्शदीप सिंग आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना (India vs England 2022) आज गुरुवारी होत आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. युवा गोलंदाज अर्शदीप सिंग आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा जोस बटलर हा इयॉन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर प्रथमच नियमित कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून ३७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४० विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपने ८.३५ च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या आहेत. अर्शदीपने पंजाबसाठी शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली. सुरुवातीच्या षटकांमध्ये तो खोडा महागडा ठरतो, पण शेवटच्या षटकांमध्ये त्याच्या चेंडूंवर धावा हे फार कठिण असते.

दरम्यान, एजबॅस्टन कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया टी-20 मध्ये सकारात्मक सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची फलंदाजी मजबूत झाली आहे.

दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हन-

इंग्लंड:

जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, रीस टोपली, मॅथ्यू पार्किन्सन.

भारत:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.